सिंधू, सायना उपांत्यपूर्व फेरीत
By Admin | Updated: October 17, 2014 02:34 IST2014-10-17T02:34:50+5:302014-10-17T02:34:50+5:30
डेन्मार्क ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधू व सायना नेहवालने महिला एकेरीमध्ये, तर पारुपल्ली कश्यप व के. श्रीकांत यांनी पुरुष एकेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.

सिंधू, सायना उपांत्यपूर्व फेरीत
ओडेन्से : डेन्मार्क ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधू व सायना नेहवालने महिला एकेरीमध्ये, तर पारुपल्ली कश्यप व के. श्रीकांत यांनी पुरुष एकेरीमध्ये उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले.
विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोनदा कांस्य पदकाचा मान मिळविणा:या सिंधूने रशियाच्या सेनिया पोलिकारपोव्हाचा 21-17, 21-19 ने पराभव केला. श्रीकांतने चिनी तैपेईच्या जेन हाओ सूचा 21-12, 21-15 ने, तर कश्यपने इंडोनेशियाच्या डियोनिसियस हेयोम रुम्बाकाचा 21-17, 17-21, 22-2क् ने पराभव केला. सायनानेही मीनात्सू मितानीचा 38 मि. 21-12, 21-1क् असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. (वृत्तसंस्था)