सिंधूने काढला "रिओ"चा वचपा, पटकावलं "इंडिया ओपन"चं जेतेपद
By Admin | Updated: April 2, 2017 21:47 IST2017-04-02T19:13:59+5:302017-04-02T21:47:56+5:30
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने इंडिया ओपनच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मरिनचा पराभव केला आहे.

सिंधूने काढला "रिओ"चा वचपा, पटकावलं "इंडिया ओपन"चं जेतेपद
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली,दि. 2 : ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने इंडिया ओपनच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मरिनचा पराभव केला आहे. सिंधूने 21-19, 21-16 असा विजय मिळवत इंडिया ओपनचे जेतेपद आपल्या नावे केलं. रिओ आॅलिंपिकच्या फायनलमध्ये सिंधूला हरवणाऱ्या कॅरोलिना मरिनशी तिची पुन्हा एकदा गाठ पडली होती. आॅलिंपिकमध्ये सिंधूचा पराभव करणाऱ्या मरीनला हरवत सिंधूने पराभवाचा वचपा काढला आहे.
आज झालेल्य़ा अंतिम लढतीत सिंधूने मरिन कॅरोलिनावर पूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवले. पहिल्या गेममध्ये कॅरोलिनाने सिंधूला कडवा संघर्ष दिला. या सामन्यात सिंधूला प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळाला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या पहिल्या गेमनंतर दुसरा गेम सिंधूने एकतर्फी जिंकला. रिओमध्ये कॅरोलिनाने सिंधूचा पराभव करत गोल्ड मेडल पटकावले होते. बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या कॅरेलिनाचा पराभव करत सिंधूने जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण केला आहे. इंडिया ओपनमध्ये सिंधूला तिसरे तर कॅरेलिनाला पहिले मानंकान मिळाले होते.
आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी. व्ही. सिंधूने शनिवारी इंडिया ओपन सुपर सिरीज बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेली कोरियन खेळाडू सुंग जी ह्यूनचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती.