सिंधू सलामीला ‘आऊट’

By Admin | Updated: April 6, 2017 04:18 IST2017-04-06T04:18:55+5:302017-04-06T04:18:55+5:30

स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांना मलेशिया ओपन सुपर सिरिजच्या महिला एकेरीच्या सलामीत पराभवाचा धक्का बसला.

Sindhu opened 'Out' | सिंधू सलामीला ‘आऊट’

सिंधू सलामीला ‘आऊट’

कुचिंग : स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांना मलेशिया ओपन सुपर सिरिजच्या महिला एकेरीच्या सलामीत पराभवाचा धक्का बसला.
रिओ आॅलिम्पिकची रौप्य विजेती सिंधू ही चीनची बिगर मानांकित चेन यूफेईकडून कडव्या संघर्षात १८-२१, २१-१९, २१-१७ ने पराभूत झाली. सहाव्या मानांकित सिंधूचे आव्हान एक तास आठ मिनिटांत संपुष्टात आले. सिंधूने गत रविवारी आॅलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मरिनला नमवून इंडिया ओपनचे जेतेपद पटकविले होत. त्यामुळे सिंधूचा पहिल्याच फेरीत पराभव धक्कादायक ठरला.
दुसरीकडे, लंडन आॅलिम्पिकची कांस्य विजेती सायना नेहवालला जपानची चौथी मानांकित अकाने यामागुची हिने ५६ मिनिटांत १९-२१, २१-१३, २१-१५ अशा फरकाने नमविले.
अजय जयराम हा मात्र पुरुष एकेरीच्या सलामीला केवळ ३१ मिनिटांत विजयी झाला. त्याने चीनच्या कियाओ बिनवर २१-११, २१-८ असा विजय साजरा केला. मनू अत्री आणि सुमित रेड्डी यांच्या जोडीलादेखील लियाओ कुआन आणि ल्यू चिया पिन या चीनच्या जोडीकडून १८-२१, २१-१८, २१-१७ ने पराभवाचे तोंड पाहावे लागले. (वृत्तसंस्था)

Web Title: Sindhu opened 'Out'