सिंधू, जयरामची सेमिफायनलमध्ये धडक
By Admin | Updated: January 16, 2015 17:21 IST2015-01-16T17:21:07+5:302015-01-16T17:21:07+5:30
मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन टूर्नामेंटमध्ये शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताच्या पी.व्ही. सिंधू आणि अजय जयराम यांनी सेमिफायनलमध्ये धडक मारली.

सिंधू, जयरामची सेमिफायनलमध्ये धडक
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, १६ - मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन टूर्नामेंटमध्ये शुक्रवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताच्या पी.व्ही. सिंधू आणि अजय जयराम यांनी सेमिफायनलमध्ये धडक मारली.
सिंधूने थायलंडच्या खेळाडूचा २३-२१, २१-०९ असा पराभव केला तर जयरामने मलेशियाच्या डॅरेन लियूचा २१-१६, २१-२३, २१-०८ या फरकाने पराभव केला. तर भारताची सुवर्ण विजेती असलेली खेळाडू परूपल्ली कश्यपला प्री क्वार्टरफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. २०१३ साली चॅम्पियन राहिलेल्या पी.व्ही. सिंधूने थायलंडच्या पोर्नटिपचा अवघ्या ३७ व्या मिनिटात पराभव करीत सेमिफायनलमध्ये धडक मारली. सेमिफायनलमध्ये धडक मारलेल्या सिंधू हिला सेमिफायनलमध्ये जापानच्या नोजोमी ओकूहारा हिच्याविरुध्द दोन हात करावे लागणार आहेत.