सिंगापूर सुपरसीरीजमध्ये कॅरोलिना मारिनकडून सिंधू पराभूत
By Admin | Updated: April 14, 2017 17:40 IST2017-04-14T17:38:29+5:302017-04-14T17:40:34+5:30
सिंगापूर ओपन सुपरसीरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिनने पीव्ही सिंधूवर...

सिंगापूर सुपरसीरीजमध्ये कॅरोलिना मारिनकडून सिंधू पराभूत
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - सिंगापूर ओपन सुपरसीरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्वफेरीच्या सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिनने पीव्ही सिंधूवर सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला. कॅरोलिनाने सिंधूवर 21-11, 21-15 असा सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला. अवघ्या 35 मिनिटात या सामन्याचा निकाल लागला.
संपूर्ण सामन्यात कॅरोलिनाने सिंधूला निष्प्रभ केले. तिला सामन्यात पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही. नुकतच इंडियन सुपरसीरीज बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सिंधूने कॅरोलिनाला नमवत जेतेपद मिळवले होते. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीतही कॅरोलिनाने सिंधूवर विजय मिळवला होता.