सिंधू-मारीनची लढत पाहणारे कोटींच्या घरात

By Admin | Updated: September 1, 2016 04:52 IST2016-09-01T04:52:52+5:302016-09-01T04:52:52+5:30

भारताची पी.व्ही. सिंधू आणि स्पेनची कॅरोलिना मारीन यांच्यादरम्यान रिओ आॅलिम्पिकची बॅडमिंटन महिला एकेरीची फायनल लढत टीव्हीवर १ कोटी ७२ लाख लोकांनी पाहिली.

Sindh-marine fighters in the house of crorers | सिंधू-मारीनची लढत पाहणारे कोटींच्या घरात

सिंधू-मारीनची लढत पाहणारे कोटींच्या घरात

नवी दिल्ली: भारताची पी.व्ही. सिंधू आणि स्पेनची कॅरोलिना मारीन यांच्यादरम्यान रिओ आॅलिम्पिकची बॅडमिंटन महिला एकेरीची फायनल लढत टीव्हीवर १ कोटी ७२ लाख लोकांनी पाहिली. प्रेक्षपणकर्त्यांनी ही माहिती दिली.
तीन गेममध्ये रंगलेल्या या लढतीत सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रक्षेपणकर्ता स्टार इंडियाने म्हटले, ‘‘ही लढत एक कोटी ७२ लाख लोकांनी पाहिली, तसेच दिवसातील सर्वांत जास्त लोकांनी त्या दिवशी पाहिलेला सर्वांत मोठा टीव्हीवरील कार्यक्रम तो होता. हॉट स्टार (स्टार इंडियाचे डिजिटल मंच) यावर ५० लाखांपेक्षा जास्त प्रेक्षकांनी लाईव्ह सामना पाहिला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय इतर स्पर्धेच्या तुलनेत ही सर्वांत मोठी संख्या ठरली.’’

Web Title: Sindh-marine fighters in the house of crorers