गुजरात लायन्सचा सहज विजय
By Admin | Updated: April 14, 2016 23:12 IST2016-04-14T23:12:37+5:302016-04-14T23:12:37+5:30
शिस्तबध्द गोलंदाजी नंतर अॅरोन फिंच (५०) आणि ब्रँडन मॅक्क्युलम(४९) यांच्या दमदार सलामीच्या जोरावर १६४ धावांचे आव्हान सहज पार केले.

गुजरात लायन्सचा सहज विजय
>ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. १४ - राइझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने विजयासाठी दिलेले १६४ धावांचे आव्हान गुजरात लायन्सने १८ षटकात ३ गड्याच्या मोबदल्यात सहज पार केले. शिस्तबध्द गोलंदाजी नंतर अॅरोन फिंच (५०) आणि ब्रँडन मॅक्क्युलम(४९) यांच्या दमदार सलामीच्या जोरावर १६४ धावांचे आव्हान सहज पार केले. फिंच आणि मॅक्क्युलमने पहिल्या विकेटसाठी ८.३ षटकात ८५ धावांची भागीदारी केली. रैनाने २४ चेंडूत २४ धावांची संयमी खेळी केली. सुरवातीचे ३ फलंदाज बाद झाल्यानंतर ब्राव्हो आणि जडेजाने चौथ्या विकेटसाठी १७ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. राइझिंग पुणे सुपरजायंट्सकडून एम. अश्विनने २ आणि इंशात शर्माने एका फलंदाजाला बाद केले.
त्यापुर्वी,
फाफ डू प्लेसिसच्या (६९) धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर धोनीच्या राइझिंग पुणे सुपरजायंट्स संघाने निर्धारित २० षटकात ५ गड्यांच्या मोबदल्यात १६३ धावा केल्या आहेत. फाफ डू प्लेसिसने दमदार फलंदाजी करताना ४३ चेंडूत ४ गगनचुंबी षटकारासह ५ चौकार लगावत झटपट ६९ धावा केल्या. डू प्लेसिसने केविन पिटरसन(३७)सोबत दुसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची महत्वपुर्ण भागीदारी केली तर पहिल्या विकेटसाठी मुंबईकर अजिंक्य रहाणे (२१) सोबत २७ धावांची भागीदारी केली.
दरम्यान, चागंल्या सुरवातीनंतर पुणे संघाला आपल्या लौकीकास खेळी करता आली नाही. हाणामारी षटकात धावगती वाढवण्याच्या नादात ढटपट फलंदाज बाद झाले आणि संघाच्या धावसंख्येला खिळ बसली. एस. स्मिथ(५), मार्श (७) यांना आपल्या लौकीकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. कर्णधार धोनी(२२)ने रजत भाटियाला सोबत घेऊन शेवटच्या दोन षटाकत चांगली फटकेबाजी केल्यामुळे संघाची भावसंख्या १५० च्या पुढे सरकली. गुजरातकडून अनुभवी तांबे आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी २ फलंदाजाला बाद केले तर डेवेन ब्राव्होने १ फलंदाज बाद केला.