महाराष्ट्राच्या स्वातीला रौप्य, संजीवनी, श्रद्धाला कांस्य

By Admin | Updated: June 30, 2016 03:46 IST2016-06-30T03:46:57+5:302016-06-30T03:46:57+5:30

महाराष्ट्राची स्वाती गाढवेने ५६ व्या राष्ट्रीय सिनियर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले.

Silver, Sanjivani, Shraddha Bronze, for Swathera of Maharashtra | महाराष्ट्राच्या स्वातीला रौप्य, संजीवनी, श्रद्धाला कांस्य

महाराष्ट्राच्या स्वातीला रौप्य, संजीवनी, श्रद्धाला कांस्य


हैदराबाद : महाराष्ट्राची स्वाती गाढवेने ५६ व्या राष्ट्रीय सिनियर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकले. दुसरीकडे याच प्रकारात संजीवनी जाधवला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. दुसरीकडे श्रद्धा घुलेने लांब उडीत कांस्यपदक जिंकले. दिल्लीच्या बी. सौम्या हिने २0 किमी चालण्याच्या स्पर्धेत बुधवारी सुवर्णपदक जिंकले.
सौम्या हिने कारकिर्दीतील आपली सर्वोत्तम कामगिरी करताना १ तास ४२ मि. ५५.२४ सेकंद वेळ नोंदविताना शानदार सुवर्णपदक जिंकले. (वृत्तसंस्था)

Web Title: Silver, Sanjivani, Shraddha Bronze, for Swathera of Maharashtra