लंडन ऑलिम्पिकसाठी योगेश्वरला मिळाले रौप्यपदक
By Admin | Updated: August 30, 2016 14:38 IST2016-08-30T07:32:50+5:302016-08-30T14:38:52+5:30
लंडन ऑलिम्पिकसाठी योगेश्वरला रौप्यपदक मिळाले आहे.योगेश्वरने टि्वटकरुन ही माहिती दिली.

लंडन ऑलिम्पिकसाठी योगेश्वरला मिळाले रौप्यपदक
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - रिओ ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू योगेश्वर दत्तचा पहिल्या फेरीतच पराभव झाला. मात्र त्याआधीच्या २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकसाठी योगेश्वरला रौप्यपदक मिळाले आहे. योगेश्वरने टि्वटकरुन लंडन ऑलिम्पिकमधले त्याचे कांस्यपदक रौप्यपदकामध्ये बदलल्याची माहिती दिली.
२०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वरच्या ६० किलो वजनी गटात खेळणा-या रशियाचा बीसीक कुडखोव्हला रौप्यपदक मिळाले होते. मात्र कुडखोव्हचा डोप चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याची पदके काढून घेण्यात आली आहेत. चारवेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेला आणि दोन ऑलिम्पिक पदके मिळवणा-या कुडखोव्हचा २०१३ मध्ये दक्षिण रशियामध्ये कार अपघातात मृत्यू झाला.
आज सुबह पता चला की मेरा olympic medal upgrade हो कर Silver medal हो गया है। ये मेडल भी देशवासियों को समर्पित हैं