सिल्व्हर ज्युबिलीचे थ्रो बॉल स्पर्धेत वर्चस्व

By Admin | Updated: September 11, 2014 22:30 IST2014-09-11T22:30:27+5:302014-09-11T22:30:27+5:30

बार्शी : येथील के. एल. ई. सोसायटी संचलित सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलचे 14 वर्षांखालील मुले व मुली तसेच 17 वर्षांखालील मुले व मुली असे चारही संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झाले. त्यामुळे चारही संघ आता पुणे विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत.

Silver Jubilee Throw Ball Competition | सिल्व्हर ज्युबिलीचे थ्रो बॉल स्पर्धेत वर्चस्व

सिल्व्हर ज्युबिलीचे थ्रो बॉल स्पर्धेत वर्चस्व

र्शी : येथील के. एल. ई. सोसायटी संचलित सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलचे 14 वर्षांखालील मुले व मुली तसेच 17 वर्षांखालील मुले व मुली असे चारही संघ जिल्हास्तरीय स्पर्धेत विजयी झाले. त्यामुळे चारही संघ आता पुणे विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले आहेत.
या संघामध्ये पुढील खेळाडूंचा समावेश होता. 14 वर्षांखालील मुली- साक्षी मेनकुदळे, साक्षी भुईटे, अपूर्वा गारुळे, सुकन्या भगत, तृप्ती बिडवे, सिमरन परदेशी, अश्विनी देवकर, अश्विनी चौगुले, आरती महंत, संस्कृती जाधव, ऋतुजा मिठे, पूजा डोईफोडे. 14 वर्षांखालील मुले- सागर वाणी, धनराज माळकर, दत्ता बोकेफोडे, यशराज जाधवर, जीवन टिंगरे, गौरव कमटाणे, महेश विभुते, अभिजित अंधारे, महेश दहीहांडे, जरेश मोरे, विवेक जाधवर, आकाश घाडगे. 17 वर्षांखालील मुली- पूजा महंत, कोमल मुटकुळे, ऐश्वर्या वांगी, पायल हुकीरे, प्रतीक्षा बोटे, अंकिता लिमकर, विनम्रता वायकर, दिव्या सवणे, पूनम पवार, वैष्णवी उकरंडे, वैष्णवी जगनाडे, सोनाली रामगुडे. 17 वर्षांखालील मुले- बिभीषण पवार, शंकर खुडे, सूरज सांगळे, शंकर गायकवाड, यश वाणी, नीलेश शिंदे, सागर टिंगरे, वैभव गात, ओंकार हिंगमिरे, अविनाश बोकेफोडे, सोहेल तांबोळी, नकुल सोनवणे.
सन 2007 पासून आजपर्यंत शाळेचे 246 खेळाडू राज्यस्तरावर व 41 खेळाडू राष्ट्रीय स्तरावर याच क्रीडा प्रकारात चमकले आहेत.
शाळेच्या योगासन संघातील मुलींनीदेखील जिल्हा स्तरावर विजय संपादन केला. ऋतुजा खाडे, वैष्णवी लुंगारे, शिवानी धारुरकर, हिमानी राऊत, सोनाली रामगुडे, वैष्णवी निंचळे या मुलींची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
मार्गदर्शक वर्षा रसाळ व हेमंत गाढवे यांचे शालेय समिती अध्यक्षा र्शीमती प्रभाताई झाडबुके व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक प्रशांत कोल्हे, उपमुख्याध्यापक जयकुमार कुंभारे व पर्यवेक्षिका अनुराधा विश्वेकर उपस्थित होते.

Web Title: Silver Jubilee Throw Ball Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.