शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
4
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
5
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
6
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
7
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
8
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
9
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
10
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
11
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
12
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
13
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
14
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
15
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
16
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
17
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
18
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
19
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
20
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

सिकंदर शेखने जिंकली मानाची महाराष्ट्र केसरी! गतविजेत्या शिवराज राक्षेला केले पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 20:04 IST

वाशिमच्या सिंकदर शेखने (Sikandar Shaikh) अखेर महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला.

वाशिमच्या सिंकदर शेखने (Sikandar Shaikh) अखेर महाराष्ट्र केसरी होण्याचा मान पटकावला. गतवर्षी त्याला अपयश आले होते आणि त्याच्या लढतीवरून बराच वाद झाला होता. सिकंदरवर अन्याय झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. पण, सिकंदरने त्याचा निर्धार कायम ठेवला आणि लक्ष विचलित होऊ न देता अखेर महाराष्ट्र केसरीची गदा उचलली. त्याने गतविजेत्या शिवराज राक्षेला (Shivraj Rakshe) पराभूत केले.  त्याने राक्षेला अवघ्या २२ सेकंदामध्ये आस्मान दाखवले.  

शिवराजने उपांत्य फेरीच्या लढतीत हर्षद कोकाटेचा पराभव केला, तर माती विभागात सिकंदरने उपांत्य फेरीत संदीप मोटेचा १०-० असा पराभव केला. शिवराज दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उचलणार की सिकंदर यंदाचं महाराष्ट्र केसरीचं मैदान मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण, अखेर सिकंदरने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत बलाढ्य शरीरयष्टीच्या शिवराजला अवघ्या आस्मान दाखवले. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीतून आणि गरिबीतून सिकंदरने कुस्तीतला प्रवास करत आपलं प्रस्थ निर्माण केलंय. आज लाखो कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील तो ताईत बनला आहे. सिकंदर मुळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचा. घरात आजोबापासूंनचा कुस्तीचा वारसा. पण या वारशावर दारिद्राची गडद छाया कायमची. घरात वडील रशिद शेख पैलवानकी करायचे. कुस्तीत जिंकलेल्या इनामावरच लग्नानंतर त्यांचं जगणं सुरू होते. मात्र, दोन मुलांच्या जन्मानंतर, बक्षीसांच्या रकमेवर चार जणांचे पोट भागेनासे झाले. म्हणून, त्यांनी स्थानिक मार्केट यार्डात हमालीचा सुरू केली. मात्र, आता कुस्तीचा शौक ते आपल्या मुलांत पाहू लागले. आपल्या लहानग्या मुलांना घेऊन आखाड्यात जाऊ लागले. मुलांना कुस्तीचे धडे देऊ लागले. सोबतीला वस्ताद चंदु काळेंचे मार्गदर्शनही मिळत होते. 

मुलगा सिंकदर चांगल्या कुस्त्या मारू लागला होता. चार पैसेही घरात येऊ लागले. पण, वडीलांना आजाराने गाठले सिकंदरच्या खुराकाला पैशांची चणचण जाणवू लागली. हा प्रसंग येताच मोठा भाऊ हुसेनने आपली कुस्ती थांबवत वडिलांच्या हमालीचे ओझे आपल्या खांद्यावर घेतले. सिंकदर वडीलांचे स्वप्न उराशी बाळगुन कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत कुस्तीचे धडे गिरवू लागला. वस्ताद विश्‍वास हारूगले यांच्या मार्गदर्शनात तो एकेक डावपेच शिकु लागला. गावाकडून भावासोबत रमेश बारसकर, बाळू चौवरे यांच्याकडून आर्थिक पाठबळ मिळत होते. यातूनच सिंकदरने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा, विद्यापीठस्तरीय स्पर्धा गाजवल्या. वयाच्या २५ व्या वर्षी अनेक अनुभवी मल्लांना चितपट करण्याची किमया सिकंदरने साधली. आपल्या आक्रमक खेळीच्या जोरावर कमी वयात सिंकदर आता महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कुस्ती पटावर चमकत आहे. 

अन्य निकाल -माती विभाग - ६५ किलो रोहन पाटील (कोल्हापूर) वि.वि. यश मगदूम (गडचिरोली), ७४ किलो -अनिल कचरे (पुणे) वि.वि. संदेश शिषमुळे (गडचिरोली) , ७० किलो - निखिल कदम (पुणे) वि.वि. अभिजित भोसले (सोलापूर), ६१ किलो - अमोल वालगुडे (पुणे जिल्हा) वि.वि. भालचंद्र कुंभ (पुणे), ५७ किलो - सौरभ इंगवे (सोलापूर) वि.वि. कृष्णा हरणावळ (पुणे), ८६ किलो - विजय डोईफोडे (सातारा) वि.वि. ओंकार जाधवराव (पुणे)

गादी विभाग ६१ किलो - पवन डोन्हर (नाशिक) वि.वि योगेश्वर तापकिर (पिंपरी चिंचवड), ७० किलो - विनायक गुरव (कोल्हापूर) वि. वि. संकेत पाटील (कोल्हापूर), ५७ किलो - आतिश तोडकर (बीड) वि.,वि. आकाश सलगर (सोलापूर).  ७४ किलो - शुभम थोरात (पुणे ) वि.वि. राकेश तांबुलकर (कोल्हापूर)

टॅग्स :Maharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाWrestlingकुस्ती