शीतल गौतमने घेतली रॉबिन उथप्पाची 'विकेट'

By Admin | Updated: November 13, 2015 15:21 IST2015-11-13T15:11:03+5:302015-11-13T15:21:28+5:30

हरभजन सिंगचे लग्न व युवीच्या साखरपुड्यानंतर आता रॉबिन उथप्पानेही साखरपुडा केला आहे.

Shuttle Gautam took Robin Uthappa's wicket | शीतल गौतमने घेतली रॉबिन उथप्पाची 'विकेट'

शीतल गौतमने घेतली रॉबिन उथप्पाची 'विकेट'

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १३ - भारतातील क्रिकेट विश्वातील अनेक खेळाडूंनी यंदाच्या वर्षी नव्या इनिंगला सुरुवात केली आहे.  हरभजन सिंगचे लग्न व युवीच्या साखरपुड्यानंतर आता रॉबिन उथप्पानेही साखरपुडा केला आहे. रॉबिनने टेनिसपटू शीतल गौतमशी साखरपुडा केला असून हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून डेट करत होते.

भारताचा क्रिकेटपटू व कोलकाता नाईट रायडर्सचा आघाडीचा फलंदाज रॉबिन उथप्पाने शुक्रवारी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर त्यांच्या साखरपुुड्याचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 'मला या सुंदर मुलीसोबत संपूर्ण आयुष्य घालवायला आवडेल' असे रॉबिनने फोटो शेअर करताना म्हटले आहे. रॉबिन व शीतलचे प्रेमसंबंध हे कधीही लपून राहिले नव्हते. शीतलला इम्प्रेस करण्यासाठी रॉबिनने जाहीर कार्यक्रमांमध्ये तिच्यासाठी गाणेही म्हटले होते. शीतल ही  टेनिसपटू असून आता दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे समजते. 

Web Title: Shuttle Gautam took Robin Uthappa's wicket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.