नेमबाजी स्पर्धेत शुभम गवळीला कांस्य
By Admin | Updated: November 28, 2015 00:01 IST2015-11-28T00:01:50+5:302015-11-28T00:01:50+5:30
जळगाव : राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धेत ला.ना. विद्यालयाचा विद्यार्थी शुभम अशोक गवळी याने १० मीटरमध्ये १७ वर्षे वयोगटात ४०० पैकी ३०१ गुण मिळवत कांस्यपदक पटकावले.

नेमबाजी स्पर्धेत शुभम गवळीला कांस्य
ज गाव : राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धेत ला.ना. विद्यालयाचा विद्यार्थी शुभम अशोक गवळी याने १० मीटरमध्ये १७ वर्षे वयोगटात ४०० पैकी ३०१ गुण मिळवत कांस्यपदक पटकावले. अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत नाशिक विभागीय संघात शुभम गवळी सहभागी झाला होता. विभागीय क्रीडा संकुलाच्या शूटिंग रेंजवर त्याने ०.१७७ ओपन साईट एअर रायफल प्रकारात ही कामगिरी केली. या स्पर्धेत नाशिक विभागीय संघात जळगावचे ११ खेळाडू सहभागी झाले होते. शुभम हा अकोला जिल्ातील परंडा येथे राहणार्या तुळशीराम यमगवळी यांचा नातू आहे. ८ वर्षांपासून जिल्हा रायफल असोसिएशनचे सचिव दिलीप गवळी यांनी त्याचे पालकत्व स्वीकारले आहे. कामगिरीबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, ला.ना.शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय देवळे, रायफल असोसिएशनचे अध्यक्ष विशन मिलवाणी, मुख्य प्रशिक्षक दिलीप गवळी, सुनील पालवे, प्रा.यशवंत सैंदाणे, प्रा.विनोद कोचुरे व विलास जुनागडे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. सोबत फोटो