शेतकराच्या पोरानं जिंकलं सोनं; 18 वर्षीय ऐश्वर्यची वर्ल्ड रेकॉर्ड कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 07:44 PM2019-07-19T19:44:19+5:302019-07-19T19:44:31+5:30

मध्य प्रदेशमधील खारगाव जिल्ह्यातल्या ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने जर्मनीत सुरू असलेल्या कनिष्ठ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली.

Shooting : Aishwarya Pratap Singh Tomar wins GOLD medal in ISSF Junior World Cup in Germany | शेतकराच्या पोरानं जिंकलं सोनं; 18 वर्षीय ऐश्वर्यची वर्ल्ड रेकॉर्ड कामगिरी

शेतकराच्या पोरानं जिंकलं सोनं; 18 वर्षीय ऐश्वर्यची वर्ल्ड रेकॉर्ड कामगिरी

Next

जर्मनी : मध्य प्रदेशमधील खारगाव जिल्ह्यातल्या ऐश्वर्य प्रताप सिंग तोमरने जर्मनीत सुरू असलेल्या कनिष्ठ वर्ल्ड कप नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली. 18 वर्षीय ऐश्वर्यने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात 459.3 गुणांच्या कमाईसह सुवर्णपदक नावावर केले. या कामगिरी सह त्यानं कनिष्ठ गटातील विश्वविक्रमही नावावर केला. या स्पर्धेत भारताचे हे दहावे सुवर्णपदक ठरले. भारतीय संघ 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 4 कांस्यपदक अशा एकूण 23 पदकांसह अव्वल स्थानावर आहे. 



या स्पर्धेत हंगेरीच्या पेक्लर झलानने 454.8 गुणांसह रौप्य, तर चीनच्या चँगहाँग झँगने 442.8 गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. ऐश्वर्यने यापूर्वी 2019च्याच आशिआई अजिंक्यपद स्पर्धेतील कनिष्ठ गटात कांस्यपदक जिंकले होते. 


गतवर्षी झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यानं 1200पैकी 1173 गुणांची कमाई करताना राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. 

Web Title: Shooting : Aishwarya Pratap Singh Tomar wins GOLD medal in ISSF Junior World Cup in Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.