नेमबाजांची नजर पदकांवर, जीतूकडून अपेक्षा

By Admin | Updated: August 5, 2016 20:03 IST2016-08-05T20:03:38+5:302016-08-05T20:03:38+5:30

स्टार खेळाडूंसह सज्ज भारतीय नेमबाजी पथक आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या आॅलिम्पिक स्पर्धेत पदकांच्या अपेक्षेने खेळणार आहे.

Shooters look medals, win-win | नेमबाजांची नजर पदकांवर, जीतूकडून अपेक्षा

नेमबाजांची नजर पदकांवर, जीतूकडून अपेक्षा

ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. ५  : स्टार खेळाडूंसह सज्ज भारतीय नेमबाजी पथक आज शनिवारपासून सुरू होत असलेल्या आॅलिम्पिक स्पर्धेत पदकांच्या अपेक्षेने खेळणार आहे. सर्वांच्या नजरा असतील त्या फॉर्ममध्ये असलेला जीतू राय याच्या कामगिरीकडेच! बीजिंग
आॅलिम्पिकचा सुवर्ण विजेता अभिनव बिंद्रा हा देखील अखेरच्या आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकून निवृत्त होण्यास इच्छूक आहे.
जीतू आणि बिंद्रा यांच्याव्यतिरिक्त गगन नारंग, मानवजीत संधू, हीना सिद्धू, आणि अपूर्वी चंदेला हे पदकाचे दावेदार आहेत. नेमबाज नेहमी बोलण्यावर नव्हे तर रेंजमध्ये कामगिरी करण्यावर विश्वास ठेवतात.

बिंद्राने तर १५ दिवसांआधीच जाहीर केले की अखेरचे आॅलिम्पिक संपेपर्यत मी कुणाच्या संपर्कात असणार नाही. जीतू आज दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात खेळणार आहे. तो ५० मीेटर पिस्तुलमध्ये विश्व चॅम्पियन असल्याने दोन्ही प्रकारात आव्हान सादर करेल. आशियाड, राष्ट्रकुल, विश्व चॅम्पियनशिप आणि विश्वचषकात पदक विजेता जीतू म्हणाला,ह्य आॅलिम्पिक काय असते हे मला माहिती नाही. मी गावातून आलो, आणि असाच राहू इच्छितो. पहिल्या दिवशी दहा मीटर एअर रायफल प्रकारात अपूर्वी चंदेला आणि अयोनिका पाल देखील खेळतील.

२०१४ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत दोघीही क्रमश: सुवर्ण
आणि रौप्य विजेत्या आहेत. हीना सिद्धू विश्व क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचलेली पहिली भारतीय खेळाडू आहे. यंदा विश्वचषकात तिने रौप्य जिंकले. लंडन आॅलिम्पिकमध्ये दहा मीटर फायनलमध्ये थोडक्यात चूक करणारी हीना यंदा येथे सावध खेळणार आहे. लंडनमध्ये विजयकुमारने भारताला २५ मीटर रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात रौप्य पदक जिंकून दिले होते. त्याच्या अनुपस्थितीत पदक जिंकण्याची जबाबदारी गुरुप्रीतसिंग याच्यावर असेल. अथेन्स आॅलिम्पिकमध्ये राज्यवर्धनसिंग राठोड याने रौप्यपदक जिंकले होते. तेव्हापासून शॉटगन नेमबाज कमाल करू शकले नाहीत. यंदा मानवजीत, के. चेनॉय(ट्रॅप)तसेच अहमद खान (स्कीट ) यांच्याकडून अपेक्षा राहील

Web Title: Shooters look medals, win-win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.