शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

पिस्तुलात बिघाड होऊनही राही सरनोबतचा सुवर्णवेध, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २५ मीटरमध्ये मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 16:30 IST

राही जुलै २०२२ ते २०२३ या कालावधीत कोरोनामुळे नेमबाजीपासून होती दूर

कोल्हापूर : कोल्हापूरची सुवर्णकन्या राही सरनोबतने ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सोनेरी वेध घेतला. सातव्या फेरीत राहीच्या पिस्तुलात बिघाड होऊनही संयमी खेळ करीत तिने सुवर्ण यशाचा अचूक निशाणा घेतला. २५ मीटर पिस्तूल प्रकारातील अंतिम लढतीत ३५ गुणांनी सुवर्ण पदकाचा वेध घेतला. डेहराडून येथे महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशूल शूटिंग रेंजमध्ये स्पर्धा सुरू आहे. सुवर्ण पदक घेत तिने शानदार पुनरागमन केले.सुरुवातीला पिछाडीवर असलेल्या राही हिने चौथ्या फेरीपासून आघाडी घेतली. सातव्या फेरीत राहीच्या पिस्तुलात थोडासा तांत्रिक बिघाड झाला होता. त्याकडे दुर्लक्ष करीत तिने शेवटपर्यंत संयम दाखवित सुवर्ण पदकावर नाव कोरले. तांत्रिक बिघाडाच्या वेळी सिमरन हिने राही हिला मागे टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहीने दोन्ही नेम अचूक साधत विजयी आघाडी कायम ठेवली.समरन प्रीत कौर ब्रार (पंजाब) आणि टी. एस. विद्या (कर्नाटक) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकाविले. महाराष्ट्राच्या रिया थत्ते हिने चौथा क्रमांक पटकाविला.राही जुलै २०२२ ते २०२३ या कालावधीत कोरोनामुळे नेमबाजीपासून दूर होती. त्यामुळे नेमबाजीतील कारकीर्द संपुष्टात येईल की काय, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र ऑक्टोबर २०२३ पासून तिने काही वेळ सरावाला सुरुवात केली. २०२४ मध्ये ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ही संधी वाया गेल्याने तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले.

ती सध्या पुणे येथील बालेवाडीत सराव करीत आहे. २०११ मध्ये रांची येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिने पहिल्यांदा भाग घेतला. आय.एस. एस. एफ जागतिक चषक मालिकांत चार सुवर्ण, एक रौप्य, दोन कांस्य पदके तिने जिंकली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य पटकाविले. आशियाई क्रीडा स्पर्धेत एक सुवर्ण, एक कांस्य पदकाची कमाई केली. तिने दोन वेळा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरShootingगोळीबारRahi Sarnobatराही सरनोबतGold medalसुवर्ण पदक