पनामाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचा गोळ्या घालून खून

By Admin | Updated: April 16, 2017 14:02 IST2017-04-16T14:02:05+5:302017-04-16T14:02:05+5:30

पनामाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू एमिलकार हेनरीक्वेज याची गोळ्या घालून हत्या

Shoot Panamer's international footballer with blood | पनामाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचा गोळ्या घालून खून

पनामाच्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूचा गोळ्या घालून खून

>ऑनलाइन लोकमत
पनामा सिटी, दि. 16 - पनामाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू एमिलकार हेनरीक्वेज याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.  कोलोन शहरात त्याचा खून करण्यात आला. अज्ञात हल्लेखोराने त्याच्यावर गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. 
 
33 वर्षीय हेनरीक्वेज  पनामा संघासाठी 75 सामने खेळला. नुकताच तो पनामाचा क्लब अराबे यूनिडोसोबत करारबद्ध झाला होता. पॅन अमेरिका फुटबॉल संघाने त्याची हत्या झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आमच्या राष्ट्रीय खेळाडूची हत्या करणं दुःखद आहे, त्याच्या आत्म्याला शांती मिळो असं ट्विट . पॅन अमेरिका फुटबॉल संघाने केलं आहे.  
 
 पनामाचे राष्ट्रपती  जुआन कार्लोस वारेला यांनी या घटनेचा निषेध केला असून हेनरीक्वेजच्या हत्यारांना शोधून काढू असं ते म्हणाले आहेत. 

Web Title: Shoot Panamer's international footballer with blood