प्रशांत मोरेचा धक्कादायक पराभव

By Admin | Updated: March 10, 2017 23:37 IST2017-03-10T23:37:22+5:302017-03-10T23:37:22+5:30

वेटरर्न सत्यनारायण दोंतूलने पहिला गेम गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करत विश्वविजेता प्रशांत मोरेचा २-१ असा पराभव केला. या विजयाच्या जोरावर सत्यनारायणने

Shocking defeat of Prashant More | प्रशांत मोरेचा धक्कादायक पराभव

प्रशांत मोरेचा धक्कादायक पराभव

मुंबई : वेटरर्न सत्यनारायण दोंतूलने पहिला गेम गमावल्यानंतर दमदार पुनरागमन करत विश्वविजेता प्रशांत मोरेचा २-१ असा पराभव केला. या विजयाच्या जोरावर सत्यनारायणने चौथ्या मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष गटात आगेकूच कायम राखली. महिला गटात वैभवी शेवाळे बाजी मारत स्पर्धेतील घोडदौड कायम राखली आहे.
मुंबई जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने बॉम्बे वायएमसीए आयोजित कॅरम स्पर्धेचे सामने आग्रीपाडा येथे खेळवण्यात येत आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत विश्वविजेता प्रशांतने अपेक्षेप्रमाणे पहिल्या गेममध्ये शानदार विजय मिळवला. प्रशांतने ब्रेक-टू-फिनिशची नोंद करत २५-४ अशा फरकाने सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये मात्र सत्यनारायणने दमदार पुनरागमन करत २५-१२ अशा फरकाने गेमवर नाव कोरले.
निर्णायक गेममध्ये प्रशांतने ही चोख प्रत्युत्तर देत सुरुवात केली. मात्र मोक्याच्या क्षणी झालेल्या चुकीचा फायदा सत्यनारायणने अचूक घेतला. अखेर तिसऱ्या गेममध्ये सत्यनारायणने २५-२० अशा फरकाने बाजी मारत स्पर्धेतील आगेकूच कायम राखली. विश्वविजेत्या प्रशांतचा पराभव करत स्पर्धेत धक्कादायक निकालाची नोंद केली.
महिला गटात वैभवी शेवाळेने शुभदा नागावकरचा २-१ असा पराभव केला. तीन गेममध्ये झालेल्या सामन्यात १-१ अशा बरोबरीनंतर निर्णायक गेममध्ये बोर्डावर आक्रमक आणि बचावात्मक खेळाचे दर्जेदार प्रदर्शन करत वैभवी शेवाळेने
पुढील फेरीत प्रवेश केला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Shocking defeat of Prashant More