विवाहाच्या वृत्तांचे शोएबकडून खंडन

By Admin | Updated: June 9, 2014 04:10 IST2014-06-09T04:10:25+5:302014-06-09T04:10:25+5:30

पाकिस्तानी तेजतर्रार गोलंदाज शोएब अख्तरने एबटाबादच्या एका १७ वर्षीय मुलीशी लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.

Shoaib controversy | विवाहाच्या वृत्तांचे शोएबकडून खंडन

विवाहाच्या वृत्तांचे शोएबकडून खंडन

कराची : पाकिस्तानी तेजतर्रार गोलंदाज शोएब अख्तरने एबटाबादच्या एका १७ वर्षीय मुलीशी लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे.
पाकिस्तानी मीडियात आलेले वृत्त बकवास असल्याचे त्याचे म्हणणे आहे. पाकिस्तानी मीडियाद्वारे अख्तर हा १७ वर्षीय रुबाबशी लग्न करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. याविषयी रावळपिंडी एक्स्प्रेस या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या शोएबने ट्विटरवर लग्न करीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच या वृत्तात सत्यता नसून माझ्या पत्रकार मित्रांनी विवेकपूर्ण रिपोर्टिंग करून अफवा पसरवू नयेत, अशी आशाही व्यक्त केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे पाकिस्तानी मीडियात शोएब १२ जून रोजी रुबाबशी विवाहबद्ध होण्यासाठी रावळपिंडीत आपल्या घरी जाणार असल्याचे म्हटले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Shoaib controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.