शोएब अख्तर झाला विवाहबद्ध

By Admin | Updated: June 26, 2014 13:12 IST2014-06-26T09:40:17+5:302014-06-26T13:12:49+5:30

रावळपिंडी एक्स्प्रेस' या नावाने प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानचा माजी तेज गोलंदाज शोएब अख्तर अखेर विवाहबंधनात अडकला आहे.

Shoaib Akhtar married | शोएब अख्तर झाला विवाहबद्ध

शोएब अख्तर झाला विवाहबद्ध

>ऑनलाइन टीम
कराची, दि. २६ - 'रावळपिंडी एक्स्प्रेस' या नावाने प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानचा माजी तेज गोलंदाज शोएब अख्तर अखेर विवाहबंधनात अडकला आहे. शोएबने पख्तूनखवा प्रांतातील हरिपूर भागात राहणा-या २० वर्षीय तरूणीशी लग्न केले आहे. एका टीव्ही चॅनलच्या रिपोर्टनुसार, बुधवारी शोएब व रुबाब या दोघांचाही निकाह पार पडला. संबंधित टीव्ही चॅनलच्या वृत्तानुसार, लग्नात हक मेहरची पाच लाख रुपये रक्कमही दिली गेली.  या लग्नासाठी शोएबचे आई-वडिलही उपस्थित होते. 

Web Title: Shoaib Akhtar married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.