शिवलकर , गोयल यांचे सी.के नायडू जीवनगौरव पुरस्कारासाठी नामांकन
By Admin | Updated: February 27, 2017 20:42 IST2017-02-27T20:25:30+5:302017-02-27T20:42:54+5:30
आपल्या जबरदस्त फिरकीच्या जोरावर अनेक वर्षे देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्य़ा पद्माकर शिवलकर आणि राजेंद्र गोयल यांचे बीसीसीआयच्या

शिवलकर , गोयल यांचे सी.के नायडू जीवनगौरव पुरस्कारासाठी नामांकन
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - आपल्या जबरदस्त फिरकीच्या जोरावर अनेक वर्षे देशांतर्गत क्रिकेट गाजवणाऱ्य़ा पद्माकर शिवलकर आणि राजेंद्र गोयल यांचे बीसीसीआयच्या कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले आहे. बीसीसीआयने ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली आहे. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 500 हून अधिक बळी घेणाऱ्या शिवलकर आणि गोयल यांची एकेकाळी देशातील आघाडीच्या फिरकी गोलंदाजांमध्ये गणना होत असे, पण त्यांना एकाही कसोटी सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नाही.
मुंबईच्या रणजी संघातून खेळणाऱ्या पद्माकर शिवलकर यांनी 124 प्रथमश्रेणी सामन्यात 589 बळी टिपले होते. 1972-73 च्या रणजी हंगामात तामिळनाडूविरुद्ध झालेल्या अंतिम लढतीत त्यांनी कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदवताना 16 धावांत 8 आणि 18 धावांत 5 बळी टिपले होते. मात्र त्यांनी मुंबईला अनेक रणजी विजेतेपदे जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तर पतियाळा, दक्षिण पंजाब, दिल्ली आणि हरयाणा या संघांकडून खेळणाऱ्या राजेंद्र गोयल यांनी 157 प्रथमश्रेणी सामन्यामधून 750 बळी टिपले होते. मात्र त्याकाळात सुभाष गुप्ते, बिशनसिंग बेदी, भागवत चंद्रशेखर आणि इरापल्ली प्रसन्ना असे महान फिरकी गोलंदाज भारतीय संघात असल्याने प्रथमश्रेणी क्रिकेटमधील दमदार कामगिरीनंतरही त्यांना कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मात्र मिळाली नाही.
NEWS ALERT - Mr. Rajinder Goel and Mr. Padmakar Shivalkar nominated for Col. CK Nayudu Lifetime Achievement Award #NAMAN#BCCIawards
— BCCI (@BCCI) February 27, 2017