शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
4
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
5
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
6
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
7
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
8
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
9
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
10
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
11
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
12
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
13
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
14
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
15
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
16
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
17
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
18
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
19
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
20
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
Daily Top 2Weekly Top 5

शिवलकर, गोयल यांना मिळणार जीवनगौरव पुरस्कार

By admin | Updated: February 28, 2017 03:58 IST

माजी राष्ट्रीय महिला संघाची कर्णधार शांता रंगास्वामीसह सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले.

नवी दिल्ली : भारताचे दिग्गज क्रिकेटपटू राजिंदर गोयल आणि पद्माकर शिवलकर यांना सोमवारी माजी राष्ट्रीय महिला संघाची कर्णधार शांता रंगास्वामीसह सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले.गोयल आणि शिवलकर कधीही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करू शकले नाहीत, तसेच शांता रंगास्वामी या पुरस्कारासाठी निवडली जाणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.डावखुरे फिरकी गोलंदाज गोयल आणि शिवलकर यांना आठ मार्च रोजी बंगळुरू येथे वार्षिक पुरस्कार सोहळ्यात सन्मानित केले जाणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली.एन. राम, रामचंद्र गुहा आणि डायना एडल्जी यांच्या मते भारताकडून खेळण्यासाठी सुदैवी न ठरलेले गोयल आणि शिवलकर यांच्या सेवेचा गौरव होण्याची आवश्यकता आहे, असे बीसीसीआयने म्हटले. शिवलकर अणि गोयल अनुक्रमे मुंबई आणि हरियाणा संघाकडून खेळत होते. त्यांनी वर्षानुवर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली. गोयल यांनी प्रथमश्रेणीत ७५0 गडी बाद केले, त्यात ६३७ रणजी करंडकमधील बळींचादेखील समावेश आहे. शिवलकर यांनी १२४ प्रथमश्रेणीत ५८९ गडी बाद केले. त्या वेळेस बिशनसिंग बेदी भारताकडून खेळत असल्यामुळे या दोन खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळू शकले नव्हते.शांता हिच्या रूपाने प्रथमच एखाद्या महिला क्रिकेटरला या पुरस्कारासाठी निवडण्यात आले. तिने १२ कसोटी आणि १६ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. महिला क्रिकेटपटूचा ज्यावर त्यांचा हक्क आहे तो मिळत आहे ही चांगली जाणीव आहे. ते प्रतिकूल दिवस होते; परंतु तरीदेखील आम्ही भविष्यासाठी पाया मजबूत करू शकलो.’’ वामन विश्वनाथ कुमार आणि दिवंगत रमाकांत देसाई यांनादेखील बीसीसीआयच्या विशेष पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले. पुरस्कार सोहळ्याआधी पाचवे एम. के. पटौदी स्मृती व्याख्यानदेखील होणार आहे. हे व्याख्यान भारताचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनिअर देणार आहेत. (वृत्तसंस्था)