शिवलकर, गोयल यांना मिळणार जीवनगौरव पुरस्कार
By Admin | Updated: February 28, 2017 03:58 IST2017-02-28T03:58:48+5:302017-02-28T03:58:48+5:30
माजी राष्ट्रीय महिला संघाची कर्णधार शांता रंगास्वामीसह सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले.

शिवलकर, गोयल यांना मिळणार जीवनगौरव पुरस्कार
नवी दिल्ली : भारताचे दिग्गज क्रिकेटपटू राजिंदर गोयल आणि पद्माकर शिवलकर यांना सोमवारी माजी राष्ट्रीय महिला संघाची कर्णधार शांता रंगास्वामीसह सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले.
गोयल आणि शिवलकर कधीही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करू शकले नाहीत, तसेच शांता रंगास्वामी या पुरस्कारासाठी निवडली जाणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.
डावखुरे फिरकी गोलंदाज गोयल आणि शिवलकर यांना आठ मार्च रोजी बंगळुरू येथे वार्षिक पुरस्कार सोहळ्यात सन्मानित केले जाणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली.
एन. राम, रामचंद्र गुहा आणि डायना एडल्जी यांच्या मते भारताकडून खेळण्यासाठी सुदैवी न ठरलेले गोयल आणि शिवलकर यांच्या सेवेचा गौरव होण्याची आवश्यकता आहे, असे बीसीसीआयने म्हटले. शिवलकर अणि गोयल अनुक्रमे मुंबई आणि हरियाणा संघाकडून खेळत होते. त्यांनी वर्षानुवर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली. गोयल यांनी प्रथमश्रेणीत ७५0 गडी बाद केले, त्यात ६३७ रणजी करंडकमधील बळींचादेखील समावेश आहे. शिवलकर यांनी १२४ प्रथमश्रेणीत ५८९ गडी बाद केले. त्या
वेळेस बिशनसिंग बेदी भारताकडून खेळत असल्यामुळे या दोन खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळू
शकले नव्हते.
शांता हिच्या रूपाने प्रथमच एखाद्या महिला क्रिकेटरला या पुरस्कारासाठी निवडण्यात आले. तिने १२ कसोटी आणि १६ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. महिला क्रिकेटपटूचा ज्यावर त्यांचा हक्क आहे तो मिळत आहे ही चांगली जाणीव आहे. ते प्रतिकूल दिवस होते; परंतु तरीदेखील आम्ही भविष्यासाठी पाया मजबूत करू शकलो.’’ वामन विश्वनाथ कुमार आणि दिवंगत रमाकांत देसाई यांनादेखील बीसीसीआयच्या विशेष पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले.
पुरस्कार सोहळ्याआधी पाचवे एम. के. पटौदी स्मृती व्याख्यानदेखील होणार आहे. हे व्याख्यान भारताचे माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनिअर देणार आहेत.
(वृत्तसंस्था)