शिव, सुमित उपांत्यपूर्व फेरीत

By Admin | Updated: May 3, 2017 00:37 IST2017-05-03T00:37:36+5:302017-05-03T00:37:36+5:30

शिव थापा (६0 किलो) आणि सुमित सांगवान (९१ किलो) यांनी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

Shiva and Sumit in the quarter-finals | शिव, सुमित उपांत्यपूर्व फेरीत

शिव, सुमित उपांत्यपूर्व फेरीत

ताश्कंद : शिव थापा (६0 किलो) आणि सुमित सांगवान (९१ किलो) यांनी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. वर्ल्ड चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता शिवने मंगळवारी येथे आव्हानात्मक विजय मिळविला. त्याने किर्गिस्तानच्या ओमुरबेक मालाबेकोव याला हरवून स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. आता त्याची लढत चिनी तैईपेच्या चु एन लाय याच्याशी होणार आहे.
तत्पूर्वी, सोमवारी (दि. १ मे) रात्री झालेल्या लढतीत ९१ किलो गटातील बॉक्सर सुमित सांगवानने मंगोलियाच्या अर्दनेबायार सांदागसुरेन याला अंतिम १६ च्या लढतीत हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठली. आशियाई आॅलिम्पिक पात्रता फेरीचा माजी सुवर्णपदक विजेत्या सुमितला चीनच्या फेंग काई यु याच्याशी दोन हात करावे लागणार आहेत. विकास कृष्णन (७५ किलो), गौरव बिधुडी (५६ किलो) आणि अमित फांगल (४९ किलो) या भारतीय खेळाडूंनीही आपआपल्या गटात यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. (वृत्तसंस्था)
 

Web Title: Shiva and Sumit in the quarter-finals