विपट, माने यांना शिवछत्रपती जीवनगौरव जाहीर

By Admin | Updated: October 22, 2015 00:59 IST2015-10-22T00:59:28+5:302015-10-22T00:59:28+5:30

राज्य सरकारने बुधवारी रात्री २०१२-१३ आणि २०१३ - १४ या दोन वर्षांच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा केली. त्यानुसार २०१२ - १३ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन

Shiv Chhatrapati Jeevandaurav announces Vipat and Mane | विपट, माने यांना शिवछत्रपती जीवनगौरव जाहीर

विपट, माने यांना शिवछत्रपती जीवनगौरव जाहीर

मुंबई : राज्य सरकारने बुधवारी रात्री २०१२-१३ आणि २०१३ - १४ या दोन वर्षांच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराची घोषणा केली. त्यानुसार २०१२ - १३ चा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार पुण्याच्या रमेश विपट यांना जाहीर झाला असून २०१३ - १४ च्या राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासाठी लातूरच्या गणपतराव माने यांची निवड झाली आहे.
मुंबईच्या पल्लवी वर्तक यांना २०१२-१३ सालचा तर पुण्याच्या उमेश झिरपे यांना २०१३-१४ सालासाठी साहसी क्रीडाकरीता शिवछत्रपती पुरस्कार जाहीर झाला. तसेच २०१२ - १३ च्या एकलव्य पुरस्कारासाठी (अपंग खेळाडू) नागपूरच्या रोशनी रिनके आणि पुण्याच्या अमोल बोरीवाले यांची निवड झाली. २०१२ - १३ सालचा जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार वर्धाच्या डॉ. नंदिनी बोंगडे यांना जाहीर झाला आहे.
शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये प्रविण ठिपसे, तेजस्विनी सावंत, अंजली भागवत, काका पवार, वीरधवल खाडे, प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांचा समावेश होता. २०१३-१४ च्या एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार (अपंग खेळाडू) साठी नागपूरची वैशाली थुलला मैदानी, टेबल टेनिस, तलवारबाजी त्याचप्रमाणे नागपूरच्या विपीन ईटनकरला मैदानी टेबल टेनिस, तलवारबाजी व पॉवर लिफ्टींग या खेळासाठी पुरुष गटात निवडण्यात आली आहे.
२०१२-१३ च्या उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी रामकृष्ण विश्वबर लोखंडे, (थेट पुरस्कार) पुणे व मकरंद सुधीर जोशी, (थेट पुरस्कार) औरंगाबाद यांना जिम्नॅस्टीक्स तसेच २०१२-१३ चा मल्लखांबसाठी यशवंत साटम, मुंबई, तलवारबाजीसाठी प्रा. उदय डोंगरे, नाशिक, हॅण्डबॉल साठी राजाराम राऊत, पुणे यांची निवड करण्यात आली आहे. २०१३-१४ च्या उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी जिम्नॅस्टीक्स या खेळासाठी हरिश परब (थेट पुरस्कार मुं. उपनगर) आणि राहुल ससाणे (मुं. उपनगर) यांची तर कुस्तीसाठी दिनेश गुंड, पुणे तर हॅण्डबॉल साठी सुनिल भोतमांगे, नागपूर यांची निवड करण्यात आली आहे.
२०१२-१३ सालचे विजेते -
तलवारबाजी : अर्चना लाड व नंदकुमार धनविजय, नागपूर; जिम्नॅस्टीक्स : रोमा जोगळेकर, पुणे व सर्वेश भाले, औरंगाबाद; जिम्नॅस्टीक्स थेट पुरस्कार : निष्ठा शहा (पुणे) अरविंद शिंदे (मुंबई), वंदिता जोशी (औरंगाबाद) व विवेक देशपांडे (औरंगाबाद); जलतरण : आदिती घुमटकर (मुंबई उपनगर), विरधवल खाडे (कोल्हापूर), विराज ढोकळे (पुणे); अथॅलेटिक्स : श्रध्दा घुले (ठाणे); सायकलींग : योगीता शिळदणकर (रायगड), शुटींग : राही सरनोबत (कोल्हापूर) व कैखुशरु इराणी (मुंबई); खो-खो : प्रियंका येळे (सातारा), युवराज जाधव (सांगली), पॉवरलिफ्टींग : प्रियदर्शनी जागुटे व प्रेमनाथ कदम (मुंबई); कुस्ती : रणजित नलावडे (पुणे); आट्यापाट्या: अपुर्वा काळे (ठाणे); हॅण्डबॉल : उज्ज्वला जाधव (कोल्हापूर); कबड्डी : स्नेहल शिंदे (पुणे), तायक्वाँदो : स्नेहा भट्ट (पुणे); मल्लखांब : अनुप ठाकुर (मुंबई).

2013-14 सालचे विजेते
सायकलिंग : दिपाली शिळदणकर (पुणे), हुसेन अजीज कोरबू (सांगली); तलवारबाजी : निशा पुजारी (ठाणे/मुंबई), दिनेश वंजारे (औरंगाबाद); जिम्नॅस्टीक्स : ॠचा सचिन दिवेकर व अभिजीत ईश्वर शिंदे (दोघेही पुणे थेट पुरस्कार); लक्ष्मी पवार (मुंबई), अजिंक्य नितीन, उत्तरा केसकर (पुणे), मिधुरा तांबे (पुणे थेट पुरस्कार); अ‍ॅथलेटिक्स : भाग्यश्री शिर्के (पुणे), बिलीयर्डस अँड स्नुकर : अरांता सांचिस (पुणे थेट पुरस्कार); बुध्दीबळ : सौम्या जयरामन स्वामिनाथन (पुणे थेट पुरस्कार); नेमबाजी : पूजा घाटकर, विक्रांत घैसास (पुणे); स्केटींग : कांचन मुसमाडे (पुणे); जलतरण : ऋतुजा भट (मुंबई उपनगर); टेबल टेनिस : दिव्या देशपांडे (पुणे); आट्यापाट्या : आकाश नंदूरकर (यवतमाळ); वृषाली गुल्हाणे (अमरावती); कबड्डी : अव्दैता मांगले (ठाणे); शरीरसौष्ठव : महेंद्र वसंत पगडे (पुणे); खो-खो : सुप्रिया गाढवे (उस्मानाबाद), तेजस शिरसकर (मुंबई उपनगर); तायक्वाँदो : संदिप गोसावी (पुणे); वेटलिफ्टींग : चंद्रकांत माळी (कोल्हापूर); कुस्ती : संदिप यादव, मुंबई (थेट पुरस्कार), विशाल माने (कोल्हापूर); मल्लखांब : आदित्य हणमंत अहिरे, सातारा

ग्रामीण भागात कार्य केलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याला हा पुरस्कार मिळाल्याने समाधान वाटले. माझ्यासारख्या ग्रामीण कार्यकर्त्याला मिळाल्याने न्याय मिळाला.
- प्रा. गणपतराव माने

गेली पन्नास वर्षे जलतरण खेळाच्या वाढीसाठी काम करीत असल्याची पावती पुरस्काराच्या रुपाने मला मिळाली आहे. या दरम्यान मला साथ देणारे मित्र, क्रीडा संघटक, कुटुंबिय या सर्वांचा मी आभारी आहे.
- रमेश विपट

Web Title: Shiv Chhatrapati Jeevandaurav announces Vipat and Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.