शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Shiv Chatrapati Award : दिलीप वेंगसरकर यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 22:33 IST

Shiv Chatrapati Award :मुंबई : सन 2019-20,2020-21 व 2021-22 असे तीन वर्षांचे एकूण ११७ पुरस्कार आज जाहीर केले गेले.

मुंबई : सन 2019-20,2020-21 व 2021-22 असे तीन वर्षांचे एकूण ११७ पुरस्कार आज जाहीर केले गेले. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार सन २०१९-२० श्रीकांत वाड(ठाणे),सन २०२०-२१ दिलीप वेंगसरकर आणि सन २०२१-२२ आदिल सुमारीवाला (मुंबई) यांना जाहीर करण्यात आला आहे. 1983 वनडे विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य असलेल्या वेंगसरकर यांनी BCCIच्या राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपदही भूषवले आहे.

तिन्ही वर्षांतील पुरस्कारांमध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कारासाठी दोन, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी (खेळाडू) 13, जिजामाता पुरस्कारासाठी (क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार) एक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी (खेळाडू) 81 , साहसी पुरस्कारासाठी 5 तसेच शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी (दिव्यांग खेळाडू) 14 अशा एकूण 116 मान्यवरांची निवड झाली आहे.

2019-20 वर्षासाठीच्या विजेत्यांमध्ये मुंबई उपनगरचा बॉक्सर सौरभ लेणेकर, कबड्डीपटू सायली जाधव, ठाण्याची पॉवरलिफ्टर नाजुका घारे, मुंबई उपनगरची सिद्धी मणेरीकर (स्पोर्ट्स क्लायंबिंग) आणि मेधाली रेडकर (डायव्हिंग/वॉटरपोलो) यांचा समावेश असून बॅडमिंटनपटू तन्वी लाड, मुंबई उपनगरचा मल्लखांबपटू दीपक शिंदे यांना थेट पुरस्कार देण्यात आला आहे. 2020-21 वर्षासाठी मुंबई शहरची नेमबाज याशिका शिंदे, ठाण्याचा कबड्डीपटू नीलेश साळुंके, मुंबई उपनगरचा खो-खोपटू अक्षय भांगरे, ठाण्याची प्रियंका भोपी, मुंबई शहरची पॉवरलिफ्टिर श्रेया बोर्डवेकर तसेच 2021-22 वर्षासाठी ठाण्याचा पॉवरलिफ्टर साहील उतेकर, मुंबई शहरची रग्बी खेळाडू भरत चव्हाण, मुंबई शहरची जलतरणपटू ज्योती पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

थेट पुरस्कारांतर्गत कबड्डी प्रकारात कबड्डी प्रशिक्षक प्रशांत चव्हाण (ठाणे) आणि प्रताप शेट्टी (ठाणे) तसेच कुस्तीमध्ये अमरसिंह निंबाळकर (पुणे) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शकासाठीच्या (2019-20) पुरस्कार विजेत्यांमध्ये डॉ. श्यामसुंदर जोशी (जिम्नॅस्टिक, औरंगाबाद), शिरीन गोडबोले (खो-खो, पुणे) आणि दिव्यांग खेळांचे क्रीडा मार्गदर्शन संजय भोसकर (नागपूर) यांचा समावेश आहे. त्या वर्षीसाठी दर्शना पंडित यांना (सॉफ्टबॉल, औरंगाबाद) जिजामाता पुरस्कार जाहीर झाला आहे. 2020-21 वर्षासाठी संजोग ढोले (जिम्नॅस्टिक्स, पुणे), राहुल राणे (स्केटिेंग, पुणे), डॉ. अभिजीत इंगोले (सॉफ्टबॉल, अमरावती) तसेच दिव्यांग खेळांचे मार्गदर्शन विनय साबळे (औरंगाबाद) यांचा समावेश आहे. 2021-22 वर्षासाठी क्रीडा मार्गदर्शक/जिजामाता पुरस्कारासाठी सिद्धार्थ कदम (जिम्नॅस्टिक्स, औरंगाबाद), चंद्रकांत इलग (धनुर्विद्या, बुलढाणा) आणि किशोर चौधरी (सॉफ्टबॉल, जळगाव) यांची निवड झाली आहे.

राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या दिव्यांग खेळाडूंमध्ये 2019-20 वर्षासाठी योगेश्वर घाटबांधे आणि भाग्यश्री माझिरे (अ‍ॅथलेटिक्स), मीन थापा (व्हीलचेअर बास्केटबॉल), आरती पाटील (बॅडमिंटन), 2020-21 वर्षासाठी दीपक पाटील आणि वैष्णवी जगताप (जलतरण)  तसेच सुरेश कुमार (व्हीलचेअर बास्केटबॉल)  आणि श्रीकांत गायकवाड (पॅरा-आर्चरी), 2021-22 वर्षासाठी प्रणव देसाई आणि आकुताई उलभगत(अ‍ॅथलेटिक्स) तसेच अनिल काची (बास्केटबॉल) आणि अनुराधा सोळंकी (व्हीलचेअर-तलवारबाजी) यांंचा समावेश आहे. 2019-20 वर्षासाठी मृणाली पांडे (बुद्धिबळ) तसेच 2021-22 वर्षासाठी भाग्यश्री जाधव (अ‍ॅथलेटिक्स)  यांना थेट पुरस्कार जाहीर झाला आहे.साहसी खेळांसाठी 2019-20 वर्षासाठी सागर कांबळे (जल), कौस्तुभ राडकर (जमीन), 2020-21 वर्षांसाठी कृष्ण प्रकाश (जल) आणि केवल कक्का (थेट पुरस्कार) तसेच 2021-22 वर्षासाठी जितेंद्र गवारे (जमीन) यांना पुरस्कार मिळाला आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई