शिर्के, शेट्टी, जगदाळे यांची लोढा समितीपुढे हजेरी
By Admin | Updated: April 10, 2015 06:20 IST2015-04-10T06:20:34+5:302015-04-10T06:20:34+5:30
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्या. लोढा समितीपुढे गुरुवारी ज्या ४ जणांची साक्ष झाली

शिर्के, शेट्टी, जगदाळे यांची लोढा समितीपुढे हजेरी
नवी दिल्ली : आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्या. लोढा समितीपुढे गुरुवारी ज्या ४ जणांची साक्ष झाली, त्यांत बीसीसीआयचे ३ अधिकारी माजी सचिव संजय जगदाळे, आयपीएलच्या सध्याच्या संचालन परिषदेचे सदस्य अजय शिर्के आणि बोर्डाचे महाव्यवस्थापक प्रा. रत्नाकर शेट्टी यांचा समावेश होता.
द. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या या चौकशीला जी चौथी व्यक्ती हजर होती, तिचे नाव प्रसिद्ध स्तंभकार मकरंद वैंगणकर असल्याचे कळते. बोर्डाचे माजी कोशाध्यक्ष शिर्के यांनी मे २०१३मध्ये जगदाळे यांच्यासोबत पदाचा राजीनामा दिला होता. (वृत्तसंस्था)