शिखर - वॉर्नरने चोपले, कोलकात्यासमोर १७८ धावांचे आव्हान

By Admin | Updated: April 22, 2015 17:48 IST2015-04-22T17:48:02+5:302015-04-22T17:48:09+5:30

डेव्हिड वॉर्नर व शिखर धवन या सलामीवारांच्या झंझावाती खेळीने सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्ससमोर १७८ धावांचे आव्हान ठेवले आहे.

Shikhar - Warner chipped in, chasing 178 before Kolkata | शिखर - वॉर्नरने चोपले, कोलकात्यासमोर १७८ धावांचे आव्हान

शिखर - वॉर्नरने चोपले, कोलकात्यासमोर १७८ धावांचे आव्हान

ऑनलाइन लोकमत

विशाखापट्टण, दि. २२ - शिखर धवन आणि डेव्हिड वॉर्नर यांनी दिलेल्या शतकी सलामीच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्ससमोर विजयासाठी १७८ धावांचे आव्हान ठेवले आहे. धवन - वॉर्नर या जोडीने १५ षटकाच्या आतच १४० धावांची सलामी दिली होती. मात्र ही जोडी फुटताच सनरायजर्सच्या फलंदाजांवर लगाम लावण्यात कोलकात्याला यश आले. बुधवारी आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हे संघ आमने सामने आहेत. कोलकात्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धवन व वॉर्नर या सलामीवीरांनी कोलकात्याच्या गोलंदाजांना अक्षरशः चोपून काढले. या जोडीने ११.३ षटकांमध्ये धावफलकावर १०० धावा झळकावल्या होत्या. १४. ३ षटकांत हैदराबादची धावसंख्या १४० पर्यंत पोहोचली होती. मात्र मॉर्ने मॉर्केलच्या गोलंदाजावीर वॉर्नर झेलबाद झाला व ही जोडी फुटली. वॉर्नरने ५५ चेंडूंमध्ये ९१ धावांची झंझावाती खेळी केली. यानंतर अँड्रे रसेलने शिखर धवनला ५४ धावांवर बाद करत हैदराबादला दुसरा धक्का दिला. ही जोडी बाद झाल्यावर रवी बोपारा व नमन ओझाही स्वस्तात बाद झाले. तर मोइजेस हेन्रिक्स व लोकेश राहुल यांनाही कोलकात्याचा गोलंदाजांनी फटकेबाजी करण्याची संधी दिली नाही. हैदराबादने २० षटकांत ४ गडी गमावत १७७ धावा केल्या. शेवटच्या पाच षटकांमध्ये हैदराबादला फक्त ३४ धावांचीच भर घालता आली. 

Web Title: Shikhar - Warner chipped in, chasing 178 before Kolkata

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.