शिखर धवनची शतकी खेळी, दिवसअखेर भारताच्या नाबाद २३९ धावा
By Admin | Updated: June 10, 2015 18:25 IST2015-06-10T12:04:10+5:302015-06-10T18:25:07+5:30
भारत वि. बांगलादेश कसोटी सामन्यात फलंदाज शिखर धवनने शानदार खेळी करत पहिल्याच दिवशी दीड शतक ठोकले आहे.

शिखर धवनची शतकी खेळी, दिवसअखेर भारताच्या नाबाद २३९ धावा
ऑनलाइन लोकमत
फतुल्लाह, दि. १० - येथे सुरू असलेला भारत वि. बांगलादेश कसोटी सामन्यात फलंदाज शिखर धवनने शानदार खेळी करत पहिल्याच दिवशी दीड शतक ठोकले आहे. शिखर धवनने १५८ चेंडूत १५० धावा केल्या, तर त्याच्या साथीला असलेल्या मुरली विजयनेही चांगली साथ देत १७८ चेंडूत ८९ धावा केल्या आहेत.
दिवसअखेर भारताच्या या सामन्यात ५६ षटकात नाबाद २३९ धावा झाल्या आहेत. याआधी पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला होता. त्यावेळी भारताने २३ षटकांत नाबाद १०७ धावा केल्या होत्या.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळत असून कागदावर बघता, या लढतीत भारताचे पारडे वरचढ भासत आहे. भारताने बांगलादेशाविरुद्ध सातपैकी सहा कसोटी सामन्यांत विजय मिळविला आहे.