मॅच फिक्सिंग संबंधित ‘ती’ याचिका फेटाळली

By Admin | Updated: August 7, 2015 22:29 IST2015-08-07T22:29:53+5:302015-08-07T22:29:53+5:30

मॅचफिक्सिंग आणि सट्टेबाजी संदर्भात न्या. मुकुल मुद्गल समितीकडून जमा करण्यात आलेल्या सीलबंद लिफाफ्यातील १३ नावे उघड करावीत

"She" petition against match-fixing rejected | मॅच फिक्सिंग संबंधित ‘ती’ याचिका फेटाळली

मॅच फिक्सिंग संबंधित ‘ती’ याचिका फेटाळली

नवी दिल्ली : मॅचफिक्सिंग आणि सट्टेबाजी संदर्भात न्या. मुकुल मुद्गल समितीकडून जमा करण्यात आलेल्या सीलबंद लिफाफ्यातील १३ नावे उघड करावीत अशी विनंती करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.
कोर्टाने बीसीसीआयचे कामकाज पारदर्शी बनविण्यासाठी सुधारणेवर काम करीत असलेल्या न्या. लोढा समितीचा कार्यकाळ देखील ३१ डिसेंबरपर्यंत वाढवून दिला आहे. क्रिकेट असोसिएशन आॅफ बिहारने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्या. मुकुल मुद्गल यांनी दिलेल्या सीलबंद लिफाफ्यातील ती १३ नावे उघड करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.
त्यावर आज सुनावणी झाली. कोर्टाने सीएबीची विनंती
फेटाळून लावली. सीएबीने याचिकेत मुदगल समितीचा चौकशी अहवाल लोढा समितीकडे सोपविण्याची मागणी केली होती. सीएबीला बीसीसीआयने अद्याप मान्यता
दिलेली नाही.
न्या. टी. एस. ठाकूर, न्या. व्ही. गोपाल गौडा आणि न्या. आर. बानूमती यांच्यापीठाने सीएबीच्या याचिकेवर सुनावणीसाठी दोन वाजताची वेळ दिली होती. बीसीसीआयमध्ये काय प्रकार चालतात याची माहिती होण्यासाठी हा
लिफाफा सार्वजनिक करण्यात
यावा, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते.(वृत्तसंस्था)

Web Title: "She" petition against match-fixing rejected