‘टीम इंडिया’साठी शास्त्री योग्य व्यक्ती
By Admin | Updated: June 13, 2015 01:22 IST2015-06-13T01:22:11+5:302015-06-13T01:22:11+5:30
इंग्लंडचे माजी महान क्रिकेटपटू जेफ्री बायकॉट यांनी भारतीय क्रिकेट संघाचे संचालक म्हणून रवी शास्त्री यांना कायम राखण्याच्या बीसीसीआयच्या

‘टीम इंडिया’साठी शास्त्री योग्य व्यक्ती
लंडन : इंग्लंडचे माजी महान क्रिकेटपटू जेफ्री बायकॉट यांनी भारतीय क्रिकेट संघाचे संचालक म्हणून रवी शास्त्री यांना कायम राखण्याच्या बीसीसीआयच्या निर्णयाची प्रशंसा केली. अव्वल स्तरावर आंतरराष्ट्रीय संघाला प्रशिक्षकापेक्षा व्यवस्थापकाची गरज असते, असे बायकॉट यांनी सांगितले.
बायकॉट म्हणाले,‘भारतीय संघाकडे प्रशिक्षक नसून रवी असल्यामुळे मला आनंद झाला. वैयक्तिक विचार करता मला रवी शास्त्री आवडतो. कारण त्याच्याकडे क्रिकेटला देण्यासाठी बरेच काही आहे. माझ्या मते प्रशिक्षक या शब्दाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे, पण व्यवस्थापक हा योग्य शब्द आहे. अव्वल पातळीवर खेळाडूंना प्रशिक्षण द्यायला नको.’ बायकॉट म्हणाले,‘जर एखाद्या गोष्टीचे व्यवस्थापन आणि संघटन करण्याची गरज असले, तर माझ्या मते कर्णधार संघाचे नेतृत्व करतो व मैदानावर संघासाठी रणनीती तयार करतो.