शास्त्रीला हवी नुकसानभरपाई
By Admin | Updated: September 6, 2014 01:41 IST2014-09-06T01:41:06+5:302014-09-06T01:41:06+5:30
टीम इंडियाच्या डायरेक्टरपदाची नवी जबाबदारी आल्याने टीव्ही कॉमेंट्री तसेच मीडियातज्ज्ञाच्या भूमिकेस मुकलेला माजी खेळाडू रवी शास्त्रीने बीसीसीआयकडे नुकसानभरपाई मागितली आहे.

शास्त्रीला हवी नुकसानभरपाई
मुंबई : टीम इंडियाच्या डायरेक्टरपदाची नवी जबाबदारी आल्याने टीव्ही कॉमेंट्री तसेच मीडियातज्ज्ञाच्या भूमिकेस मुकलेला माजी खेळाडू रवी शास्त्रीने बीसीसीआयकडे नुकसानभरपाई मागितली आहे.
वृत्तानुसार टीम इंडियाचा संचालक बनलेल्या शास्त्रीला कॉमेंट्री सोडावी लागली शिवाय मीडियात प्रकाशित होणा:या कॉलम लिहिण्यापासून मुकावे लागले. यामुळे आर्थिक नुकसानभरपाई देण्याची कैफियत त्याने बीसीसीआयपुढे मांडली. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका भारताने 1-3 ने गमाविल्यानंतर बीसीसीआयने राष्ट्रीय संघाच्या सपोर्ट स्टाफला सक्तीची विश्रंती देत रवी शास्त्रीला डायरेक्टरची नवी भूमिका बहाल केली. या बदलानंतर टीम इंडियाने वन-डे मालिका खिशात घातली हे विशेष.
दरम्यान बोर्डाने रवी शास्त्रीला दीड कोटी रुपये तसेच काही अतिरिक्त सोयी पुरविण्यास मंजुरी दिल्याचे वृत्त आहे. सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्री पुढील दोन वर्षे ही भूमिका बजाविण्यास तयार आहे.
ऑस्ट्रेलिया दौ:यासाठी संघात व्यापक फेरबदल करूनयेत आणि टीम इंडियाला बलाढय़ करण्यावर जोर द्यावा, असे शास्त्रीने बोर्डाला कळविले आहे. (वृत्तसंस्था)