शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

शारापोव्हाचे अस्थायी निलंबन

By admin | Updated: March 9, 2016 05:18 IST

शारापोव्हाचे अस्थायी निलंबन

लॉस एन्जल्स : पाचवेळा ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावणारी माजी नंबर वन महिला टेनिसपटू रशियाच्या मारिया शारापोव्हाने आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यान डोप चाचणीत दोषी आढळल्याचे कबूल केले आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) तिच्यावर निलंबनाची कारवाई केली. निलंबन अस्थायी स्वरूपाचे आहे. टेनिस जगतात सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू असलेल्या शारापोव्हाने सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले, की २००६ पासून मेलडोनियम नावाच्या औषधाचे सेवन ती करीत असल्याचे सांगितले, पण विश्व डोपिंगविरोधी एजन्सीने (वाडा) २०१६मध्ये या औषधाचा बंदी असलेल्या औषधामध्ये समावेश केला. त्यामुळे ही परिस्थिती उद््भवली आहे. शारापोव्हाला पुढील कारवाईपर्यंत आयटीएफने तडकाफडकी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. रशियन खेळाडूला चार वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शारापोव्हाने सांगितले की, तिचे नमुने यंदा २६ जानेवारी रोजी घेण्यात आले होते. त्यात मेलडोनियम असल्याचे निष्पन्न झाले. मधुमेहासाठी या औधषाचा वापर करीत होते. कारण माझ्या कुटुंबामध्ये या आजाराचा इतिहास आहे. गेल्या महिन्यात मेलडोनियम नावाच्या औषधाचे सेवन करण्यात दोषी आढळलेली रशियन खेळाडू सातवी अ‍ॅथ्लिट आहे. पण वाडाने बंदी घातलेली ती पहिली खेळाडू आहे. विश्व डोपिंगविरोधी एजन्सीने आपल्या वक्तव्यात स्पष्ट केले की, आम्हाला या चर्चेतील प्रकरणाची कल्पना असून, अन्य प्रकरणांप्रमाणे या प्रकरणातही पुढील कारवाई करण्यात येईल. आयटीएफचा निर्णय झाल्याशिवाय या चर्चित प्रकरणात वाडातर्फे कुठली टिप्पणी केल्या जाणार नसल्याचे संकेत मिळत आहे. आयटीएफच्या निर्णयाची वाडातर्फे समीक्षा करण्यात येईल आणि त्यानंतर क्रीडा लवादामध्ये या प्रकरणासाठी अपील करायचे किंवा नाही, याबाबत निर्णय घेण्यात येईल. वाडाने स्पष्ट केले, की मेलडोनियमचा वर्ष २०१६मध्ये बंदी असलेल्या औषधामध्ये समावेश करण्यात आला आहे. जानेवारीपासून हा निर्णय लागू झाला. (वृत्तसंस्था)माझे फॅमिली डॉक्टर मला गेल्या १० वर्षांपासून मिलड्रोनेट नावाचे औषध देत आहे. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघातर्फे (आयटीएफ) मला एक पत्र मिळाले. त्यानंतर मला कळले, की मी ज्या औषधाचे सेवन करीत आहे ते मेलडोनियमचे दुसरा नाव आहे. त्याबाबत मला कल्पना नव्हती. मी डोप चाचणीत अपयशी ठरली आणि त्याची सर्व जबाबदारी मी स्वीकारली आहे. ही माझी चूक असून मला कुठल्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे, याची कल्पना आहे. करिअर संपविण्याची माझी इच्छा नाही. मला पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे. - मारिया शारापोव्हा मेलडोनियम या औषधाचा वापर छातीत दुखणे, हृदयविकार किंवा मधुमेह यांसारख्या आजारावर उपचारासाठी करण्यात येतो. पण, जाणकारांच्या मते खेळाडू याचा वापर क्षमता वाढविण्यासाठी करतात. रिकव्हरीसाठी याची मदत होते. या औषधाचा अमेरिकेत उपयोग केला जात नाही, पण रशिया, लात्विया आणि अन्य काही देशांमध्ये याचा वापर केला जातो. > मी मोठी चूक केली असून, आपल्या चाहत्यांना निराश केले. मी याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारीत आहे.दरम्यान, हे चुकीने घडले असल्याचा दावा शारापोव्हाने केला आहे, पण त्यासाठी मला मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. याची सुरुवात क्रीडा साहित्य व पोषाख तयार करणारी जगातील प्रख्यात कंपनी नाइकीने करार संपुष्टात आणून केली आहे. नाइकीने स्पष्ट केले की, शारापोव्हा डोप चाचणीत अडकल्याच्या वृत्तामुळे आम्हाला दु:ख झाले. आम्हाला सुरुवातीला या वृत्ताचे आश्चर्य वाटले. शारापोव्हा या प्रकरणातून बाहेर पडत नाही तोपर्यंत नाइकी तिच्यासोबतचा करार संपुष्टात आणत आहे.