कॅरोलिन वोज्नियाकीकडून शारापोव्हाला पराभवाचा धक्का
By Admin | Updated: September 2, 2014 02:48 IST2014-09-02T02:48:07+5:302014-09-02T02:48:07+5:30
वोज्नियाकीकडून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे स्पर्धेत गाशा गुंडाळावा लागला़ यापाठोपाठ स्पेनच्या डेव्हिड फेररनेही घरचा रस्ता धरला़

कॅरोलिन वोज्नियाकीकडून शारापोव्हाला पराभवाचा धक्का
न्यूयॉर्क : रशियन टेनिस सुंदरी मारिया शारोपोव्हा हिला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत कॅरोलिन वोज्नियाकीकडून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे स्पर्धेत गाशा गुंडाळावा लागला़ यापाठोपाठ स्पेनच्या डेव्हिड फेररनेही घरचा रस्ता धरला़ मात्र, स्वित्ङरलडचा रॉजर फेडरर स्पर्धेची चौथी फेरी गाठण्यात यशस्वी ठरला़
पाच वेळा ग्रँडस्लॅमविजेती आणि 2क्क्6मध्ये येथे किताब जिंकणा:या शारोपोव्हाला डेन्मार्कच्या 1क्वे मानांकन प्राप्त कॅरोलिनचे आव्हान मोडून काढता आले नाही़ एकेरीच्या अटीतटीच्या लढतीत वोज्नियाकीने 6-4, 2-6, 6-2 असा विजय मिळवून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला़ पुरुष एकेरी गटातील तिस:या फेरीच्या सामन्यात स्वित्ङरलडच्या रॉजर फेडररने स्पेनच्या मार्सेल ग्रेनोलर्सवर 4-6, 6-1, 6-1, 6-1 असा विजय मिळवून थाटात चौथ्या फेरीत मजल मारली़ विशेष म्हणजे, या लढतीत फेडररला पहिला सेट गमवावा लागला होता़ मात्र, यानंतर त्याने जोरदार मुसंडी मारताना सामन्यात बाजी मारली़ अन्य लढतीत 26वे मानांकनप्राप्त फ्रान्सच्या जाईल्स सिमोन याने स्पेनच्या डेव्हिड फेररचा 6-3, 3-6, 6-1, 6-3 असा फडशा पाडताना मोठा उलटफेर केला, तर फ्रान्सचा गाएल मोफिल्सने आपल्याच देशाच्या रिचर्ड गास्कटला सरळ सेटमध्ये 6-4, 6-2, 6-2 ने धूळ चारून स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला़
पुरुष गटात ङोक प्रजासत्ताकाच्या टॉमस बेर्डीचने रशियाच्या तेमुराज गाबाशिविलवर 6-3, 6-2, 6-4 ने सरशी साधली, तर बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हने बेल्जियमच्या डेव्हिड गोफिनचा क्-6, 6-3, 6-4, 6-1 असा पराभव करून चौथी फेरी गाठली़ इटलीच्या सारा इरानीने आपले विजयी अभियान कायम राखल़े तिने क्रोएशियाच्या मिरजाना लुसी बरोनीचा 6-2, 2-6, 6-क् असा पराभव करून चौथ्या फेरीत प्रवेश केला़ अन्य एकेरी लढतीत स्वित्ङरलडच्या बेलिंडा बेनसिस हिने माजी नंबर वन खेळाडू येलेना यांकोविचवर 7-6, 6-3 असा विजय मिळवून अंतिम 8 खेळाडूंत स्थान निश्चित केल़े (वृत्तसंस्था)
बोपण्णा मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत
4न्यूयॉर्क : भारताच्या रोहन बोपन्ना याने स्लोवेनियाच्या कॅटरिना सरेबोटनिकसह खेळताना अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला़
4बोपन्ना आणि सरेबोटनिक या जोडीने स्पेनच्या मेडिना गॅरीग्वेज आणि दक्षिण आफ्रिकेच्या रावेन क्लासेन या जोडीवर 1 तास आणि 4 मिनिटे रंगलेल्या लढतीत 6-3, 6-4ने सरशी साधून स्पर्धेत आगेकूचकेली़
4बोपन्ना आणि सरेबोटनिक या जोडीने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाचे प्रदर्शन करताना पहिला सेट 3क् मिनिटांत आपल्या नावे केला़ यानंतरही आपल्या खेळात सातत्य राखून सामन्यावर आपले नाव कोरल़े