तिस-या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूर खेळणार
By Admin | Updated: October 6, 2016 17:16 IST2016-10-06T04:46:30+5:302016-10-06T17:16:38+5:30
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारताच्या विजयामध्ये निर्णायक मारा करणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे इंदूर येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे

तिस-या कसोटी सामन्यात शार्दुल ठाकूर खेळणार
>इंदूर : न्यूझीलंडविरुद्धच्या तिस-या कसोटीत सामन्यात मुंबईकर युवा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. गेल्या कसोटी सामन्यात निर्णायक मारा करणारा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे सामना खेळू शकणार नाही. त्यामुळे भुवनेश्वरच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे. यासंदर्भात माहिती
बीसीसीआयने एका पत्रकाद्वारे दिली आहे
याआधीच, भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज इशांत शर्मा चिकुनगुनियामुळे संघाबाहेर गेल्यानंतर भुवनेश्वर कुमारही दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्याने भारतीय वेगवान फळीला झटका बसला आहे. मात्र, देशांतर्गत स्पर्धेत सातत्याने चमकदार कामगिरी केलेल्या शार्दुल ठाकूरची भुवनेश्वरच्या जागी संधी मिळाली आहे. याआधी वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये शार्दुलचा भारतीय संघात समावेश होता, परंतु त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नव्हती. त्यामुळे इंदूर कसोटीमध्ये शार्दुलच्या पदार्पणाची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जाणून घ्या शार्दुल ठाकूर विषयी...
गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने मुंबई ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करताना सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. पालघरजवळील माहीम गावातील हा २२ वर्षीय युवा गोलंदाज नंतर मुंबईच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ झाला. यंदाच्या मोसमात मुंबईला ४१वे रणजी विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिल्यानंतर शार्दुलने शेष भारत संघाविरुद्धच्या इराणी करंडक सामन्यातही मुंबईचे प्रतिनिधित्व केले.
निवृत्त शिक्षक नरेंद्र ठाकूर यांच्या या मुलाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवला आहे. इच्छा असेल तिथे मार्ग नक्की असतो, हे मानणारा शार्दुल प्रारंभीच्या दिवसांमध्ये पहाटे ४ वाजता उठून पालघर येथून मुंबई गाठायचा. सहा चेंडूंमध्ये सहा षटकार मारण्याची किमया केल्यानंतर शार्दुल प्रथम प्रकाशझोतात आला. त्यानंतर प्रचंड मेहनत करून त्याने आपल्या कामगिरीत सातत्य राखले. आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झाली आहे. यानिमित्ताने शार्दुलबरोबर मारलेल्या गप्पा...
- शैक्षणिक प्रवास...
शार्दुलचे आठवीपर्यंतचे शिक्षण पालघरातील आनंदाश्रम कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलमध्ये झाले.
पुढे नववीसाठी बोईसर येथील तारापूर विद्यामंदिर शाळेत प्रवेश घेतल्यानंतर दहावी बोरीवलीच्या स्वामी विवेकांनद इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केले.
मुंबईतील खालसा कॉलेजमधून बारावी पूर्ण झाल्यावर रिझवी कॉलेजमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
- अनेक स्पर्धांमधून खेळाची चुणूक...
पालघर - डहाणू तालुका क्रिकेट असोसिएशनच्या अनेक सराव शिबिरांत शार्दुलने क्रिकेटचे धडे गिरवले.
आयपीएल स्पर्धेत किंग्ज इलेव्हन क्रिकेट संघात निवड.
गत रणजी मोसमात केलेल्या अष्टपैलू कामगिरीमुळे भारत ‘अ’ संघात निवड.