शरथ, मौमाने केले रियोचे तिकीट पक्के
By Admin | Updated: April 17, 2016 03:33 IST2016-04-17T03:33:14+5:302016-04-17T03:33:14+5:30
भारतीय पुरुष खेळाडू अचंथा शरथ कमल आणि महिला खेळाडू मौमा दास यांनी शनिवारी आशियाई क्वॉलिफिकेशन टेबल टेनिस स्पर्धेत आपापल्या गटात जबरदस्त कामगिरी

शरथ, मौमाने केले रियोचे तिकीट पक्के
कटाया (हाँगकाँग) : भारतीय पुरुष खेळाडू अचंथा शरथ कमल आणि महिला खेळाडू मौमा दास यांनी शनिवारी आशियाई क्वॉलिफिकेशन टेबल टेनिस स्पर्धेत आपापल्या गटात जबरदस्त कामगिरी करताना आॅगस्टमध्ये होणाऱ्या रियो आॅलिम्पिकसाठी आपले तिकीट पक्के केले.
काही दिवसांपूर्वीच दक्षिण आशियाई झोन क्वॉलिफायर्समध्ये तिसऱ्या स्थानी राहून निराशाजनक कामगिरीला मागे टाकताना अचंथा शरथने येथे हाँगकाँगच्या एलिझाबेथ स्टेडियममध्ये सुरू असलेल्या पुरुष गटाच्या निर्णायक फायनल राऊंडमध्ये विजयासह रियोचे तिकीट पक्के केले.
आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत अचंथा शरथने पुरुष एकेरीत इराणच्या नौशाद आलमिया याचा १२-१४, ११-६, ३-११, ७-११, ११-४, ११-७, ११-६ असा ४-३ ने पराभव केला. आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची शरथची ही दुसरी वेळ असेल. याआधी त्याने २00४ च्या अॅथेन्स आॅलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
दुसरीकडे महिलांमध्ये भारतीय खेळाडू मौमा दास हिने सकाळी फायनल राऊंडमध्ये उत्तर कोरियाच्या री मियोंग सून हिच्याकडून ३-११, ९-११, १0-१२, ५-११ असा पराभव पत्करावा लागल्यानंतरही हार मानली नाही आणि तिने उज्बेकिस्तानच्या रिमा गुफरानोवा हिचा ११-१३, ११-९, १३-११, ११-७, १२-१0 अशा ४-१ फरकाने विजय मिळवत रिओचे तिकीट पक्के केले. ३२ वर्षीय मौमा हिने या
गटातील दोनपैकी एक कोटा आपल्या नावावर केला.(वृत्तसंस्था)