शारापोव्हा, व्हीनस, वावरिंका विजयी
By Admin | Updated: August 29, 2014 01:30 IST2014-08-29T01:30:43+5:302014-08-29T01:30:43+5:30
आॅस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाने संघर्षपूर्ण सामन्यात अमेरिकन ओपनच्या पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले

शारापोव्हा, व्हीनस, वावरिंका विजयी
न्यूयॉर्क : आॅस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाने संघर्षपूर्ण सामन्यात अमेरिकन ओपनच्या पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत स्थान मिळविले. महिलांच्या गटात मारिया शारापोव्हा आणि व्हीनस विल्यम्सने विजयाचा आस्वाद घेतला परंतु अग्निस रदवांस्काला पराभवाचा धक्का बसला.
वावरिंकाने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत ब्राझीलच्या थॉमस बलुची याला ६-३, ६-४, ३-६ आणि ७-६ असे हरवून तिसरी फेरी गाठली. महिला गटात पाचवी मानांकित रशियाच्या मारिया शारापोव्हा आणि अनेक वर्षानंतर अंतिम २0 खेळाडूमध्ये स्थान मिळविण्यास यशस्वी ठरलेली व्हिनस विल्यम्स यांना तिसऱ्या फेरीत पोहचण्यात फारसा अडथळा आला नाही, परंतु पोलंडच्या रदवांस्काला चीनच्या पेंग शुआईने पराभवाचा धक्का देत यंदाच्या स्पर्धेतील पहिला धक्कादायक विजय नोंदविला. बिगर मानांकित शुआईने विद्युत झोतात खेळल्या गेलेल्या सामन्यात रदवांस्का हिला ९६ मिनिटात ६-३, ६-४ असे गुंडाळले. शारोपोव्हाने रोमानियाच्या एलेक्झांड्रा डुल्घेरु हिला ४-६, ६-३, ६-२ असे हरविले. विल्यम्सने स्विर्त्झंलंडच्या टिमिया वासिनजस्की हिला ६-१, ६-४ असे सरळ सेटमध्ये हरवून तिसऱ्या सेटचे प्रवेशद्वार उघडले. व्हीनस चार वर्षानंतर स्पर्धेची तिसरी फेरी गाठली आहे. (वृत्तसंस्था)