शारापोव्हाला फ्रेंच ओपनमध्ये प्रवेश नाकारला!
By Admin | Updated: May 17, 2017 04:02 IST2017-05-17T02:15:31+5:302017-05-17T04:02:33+5:30
फ्रेंच ओपन टेनिसमध्ये दोनदा अजिंक्य ठरलेल्या मारिया शारापोव्हाला यावेळेस वाइल्ड कार्डद्वारा प्रवेश नाकारण्यात आला.

शारापोव्हाला फ्रेंच ओपनमध्ये प्रवेश नाकारला!
ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 17 - फ्रेंच ओपन टेनिसमध्ये दोनदा अजिंक्य ठरलेल्या मारिया शारापोव्हाला यावेळेस वाइल्ड कार्डद्वारा प्रवेश नाकारण्यात आला.
३0 वर्षीय रशियन खेळाडू शारापोव्हा डोपिंग प्रकरणात अडकल्याने तिच्यावर १५ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. बंदीनंतर खेळताना तिचे मानांकन अत्यंत घसरले. जखमीमुळे खेळाडू खेळू शकला नाही तर वाइल्ड कार्डने प्रवेश देण्यात येतो; पण डोपिंग प्रकरणानंतर खेळाडूला वाइल्ड कार्डने प्रवेश देण्यात येत नाही, असे फ्रेंच टेनिस फेडरेशनचे प्रमुख बर्नार्ड गुडीसेली फेरानदीन यांनी स्पष्ट केले. फ्रेंच ओपनचे सामने २८ मेपासून सुरु होत आहे.