ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. ६ - ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती स्वीकारली आहे. वॉटसनने ५९ कसोटी सामन्यांमध्ये ३५.१९ च्या सरासरीने ३,७३१ धावा केल्या आहेत. तर ७५ विकेटही त्याच्या खात्यात जमा आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून शेन वॉट्सनला दुखापतीने ग्रासले असून सध्या तो फॉर्मातही नव्हता. अॅशेस मालिकेत त्याच्या निराशाजनक कामगिरीवरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर शेन वॉटसनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. 'निवृत्तीचा निर्णय घेणे विशेषतः गेल्या महिनाभरानंतर माझ्यासाठी कठीण होते. पण आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. मी आता फक्त एकदिवसीय व टी - २० क्रिकेटमध्येच खेळीन' अशी प्रतिक्रिया शेन वॉटसनने दिली. खुप विचारांती मी हा निर्णय घेतला आहे, माझ्यासाठी, संघासाठी व कुटुंबासाठी हा निर्णय योग्य ठरेल का या विचारात मी फसलो होतो असे त्याने सांगितले. २००५ मध्ये वॉटसनने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.