शमी, उमेशची जागतिक दर्जाचे गोलंदाज बनण्याकडे वाटचाल : अख्तर

By Admin | Updated: March 12, 2015 00:35 IST2015-03-12T00:35:31+5:302015-03-12T00:35:31+5:30

विश्वचषक स्पर्धेत मोहंमद शमी आणि उमेश यादव यांच्या परिपक्व कामगिरीने पाकिस्तानचा माजी तेजतर्रार गोलंदाज शोएब अख्तरही प्र

Shami, Umesh will move towards becoming world class bowler: Akhtar | शमी, उमेशची जागतिक दर्जाचे गोलंदाज बनण्याकडे वाटचाल : अख्तर

शमी, उमेशची जागतिक दर्जाचे गोलंदाज बनण्याकडे वाटचाल : अख्तर

नवी दिल्ली : विश्वचषक स्पर्धेत मोहंमद शमी आणि उमेश यादव यांच्या परिपक्व कामगिरीने पाकिस्तानचा माजी तेजतर्रार गोलंदाज शोएब अख्तरही प्रभावित झाला आहे. भारताच्या या दोन वेगवान गोलंदाजांची वाटचाल ही जागितक दर्जाचे गोलंदाज बनण्याकडे असल्याचे मत शोएब अख्तरने व्यक्त केले.
शोएब अख्तर म्हणाला, की भारतीय संघाची पाच सामन्यांत ५० विकेट ही कामगिरी खूपच जबरदस्त आहे. मी या सर्वच सामन्यांत शमी आणि उमेश यांनी दाखविलेल्या परिपक्व कामगिरीने खूष झालो आहे आणि या दोघांची दखल जागतिक पातळीवर गोलंदाजांत घेतली जाईल, असा मला विश्वास वाटतो.
शमीने आतापर्यंत ४ सामन्यांत १२ विकेट घेतल्या आहेत, तर
उमेशच्या नावावर ५ सामन्यांत ७ बळी आहेत. या दोघांना गोलंदाजी करताना पाहून आनंद वाटतो, असे अख्तर म्हणाला. तो पुढे म्हणाला, ‘‘त्यांना खूप सुरेख गोलंदाजी करताना आणि आपल्या क्रिकेटचा खूप आनंद लुटताना पाहणे खूपच चांगले वाटले.’’
शमीनेदेखील त्याला गवसलेल्या सुराचे श्रेय शोएब अख्तरला दिले आहे. शोएब अख्तरने शमीला त्याचा रनअप कमी करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे शमीच्या गोलंदाजीचा वेग वाढला. (वृत्तसंस्था)

Web Title: Shami, Umesh will move towards becoming world class bowler: Akhtar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.