भारताचा लाजिरवाणा पराभव, प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे गालबोट
By Admin | Updated: October 6, 2015 01:40 IST2015-10-06T01:40:26+5:302015-10-06T01:40:26+5:30
भारतीय फलंदाजांची लाजिरवाणी कामगिरी आणि प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे दुसऱ्या टी-२० सामन्याला गालबोट लागले. या लढतीत द. आफ्रिकेने टीम इंडियावर ६ विकेट

भारताचा लाजिरवाणा पराभव, प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे गालबोट
कटक : भारतीय फलंदाजांची लाजिरवाणी कामगिरी आणि प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे दुसऱ्या टी-२० सामन्याला गालबोट लागले. या लढतीत द. आफ्रिकेने टीम इंडियावर ६ विकेट व १७ चेंडू राखून दणदणीत विजय मिळवित तीन सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली.
बाराबत्ती स्टेडियमच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेकीचा कौल मिळवीत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
त्यांनी १७.२ षटकांत ९२ धावा केल्या. भारतीय संघाची द. आफ्रिकेविरुद्धची ही नीचांकी धावसंख्या आहे.
द. आफ्रिकेच्या एबी डिव्हीलियर्सने १९, डिफाफ डू प्लेसिसने १६, जे पी ड्युमिनीने नाबाद ३० करून भारताने दिलेले ९३ धावांचे आव्हान १७.१ षटकांत ४ बाद ९६ धावा करीत पूर्ण केले.
तत्पूर्वी, भारतीय संघाकडून रोहित शर्मा २२, शिखर धवन ११, सुरेश रैना २२, आर. आश्विन ११ हेच फक्त दुहेरी धावसंख्या गाठू शकले. अॅल्बी मॉर्केलने ४ षटकांत १२ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. लेगस्पिनर इम्रान ताहिरने चार षटकांत २४ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. मॉर्केलने कर्णधार महेंद्रसिंह धोनी (५), अक्षर पटेल (९) आणि भुवनेश्वर कुमार (०) यांना माघारी परतवले. ताहिरने रैना (२२), हरभजनसिंगला (०) एकापाठोपाठ माघारी परतवले. मॉरिसने २.२ षटकांत १६ धावांच्या मोबदल्यात शिखर धवन (११) आणि रविचंद्रन आश्विन यांना बाद केले. (वृत्तसंस्था)
धावफलक
भारत : रोहित शर्मा धावबाद २२, शिखर धवन पायचित गो. मॉरिस ११, विराट कोहली धावबाद ०१, सुरेश रैना झे. अमला गो. ताहिर २२, अंबाती रायडू त्रि. गो. रबादा ००, महेंद्रसिंह धोनी झे. डीव्हिलियर्स गो. मॉर्केल ०५, अक्षर पटेल झे. प्लेसिस गो. मॉर्केल ०९, रविचंद्रन आश्विन त्रि. गो. मॉरिस ११, भुवनेश्वर कुमार त्रि. गो. मॉर्केल ००, मोहित शर्मा नाबाद ००. अवांतर (११). एकूण : १७.२ षटकांत सर्व बाद ९२. गोलंदाजी : केली एबोट ३-०-२१-०, इम्रान ताहिर ४-०-२४-२, के. रबादा ४-०-१८-१, मॉरिस २.२-०-१६-२, मॉर्केल ४-०-१२-३.
द. आफ्रिका : एबी डिव्हिलीयर्स त्रि. गो. आश्विन १९, हाशिम आमला झे. शर्मा गो. आश्विन २, फाफ डू प्लेसिस झे. मोहित शर्मा गो. आश्विन १६, जेपी ड्युमिनी नाबाद ३०, फरहान बेहार्डिन पायचित गो. पटेल ११, डेव्हिड मिलर नाबाद १०; अवांतर ८; एकूण १७.१ षटकांत ४ बाद ९६. गोलंदाजी : आर. आश्विन ३/२४, अक्षर पटेल १/१७.