शाहिद अफ्रिदी कर्णधार पदावरुन पायउतार होणार
By Admin | Updated: March 21, 2016 20:33 IST2016-03-21T20:10:48+5:302016-03-21T20:33:31+5:30
टी-२० वर्ल्डकप सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागलेल्या पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू शाहिद अफ्रिदी आपल्या कर्णधार पदावरुन पायउतार होणार असल्याची माहिती

शाहिद अफ्रिदी कर्णधार पदावरुन पायउतार होणार
>ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. - २१ - टी-२० वर्ल्डकप सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागलेल्या पाकिस्तान संघाचा अष्टपैलू खेळाडू शाहिद अफ्रिदी आपल्या कर्णधार पदावरुन पायउतार होणार असल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी सोमवारी दिली.
वर्ल्डकप संपल्यानंतर शाहिद अफ्रिदीने पाकिस्तान संघातून निवृत्त होणार असल्याचे स्वत:च सांगितले होते. त्यानुसारच त्याची टी-२० वर्ल्डकपसाठी पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली होती. तसेच, याबद्दल त्याचे मतपरिवर्तन झाल्यास त्याला एक खेळाडू म्हणूनही संघात ठेवायचे की नाही याचा निर्णय आम्हालाच घ्यावा लागणार आहे, असे शहरयार खान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.