लैंगिक शोषण प्रकरण अ‍ॅथलेटिक्स आयोगाकडे

By Admin | Updated: August 7, 2015 22:29 IST2015-08-07T22:29:02+5:302015-08-07T22:29:02+5:30

ज्यूनियर नेमबाज खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले मुख्य नेमबाजी प्रशिक्षक स्टेनिसलाव लेपिडस यांचे प्रकरण अ‍ॅथलेटीक्स आयोगाकडे

Sexual abuse case athletics commission | लैंगिक शोषण प्रकरण अ‍ॅथलेटिक्स आयोगाकडे

लैंगिक शोषण प्रकरण अ‍ॅथलेटिक्स आयोगाकडे

नवी दिल्ली : ज्यूनियर नेमबाज खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले मुख्य नेमबाजी प्रशिक्षक स्टेनिसलाव लेपिडस यांचे प्रकरण अ‍ॅथलेटीक्स आयोगाकडे सोपविण्याचा निर्णय नॅशनल रायफल असोसिएशन आॅफ इंडियाने (एनआरएआय) घेतला आहे. यामध्ये अनुभवी नेमबाज अंजली भागवत व सुमा शिरुर यांच्या तक्रारीचा देखील समावेश आहे.
एनआरएआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भागवत व शिरुर यांना यावेळी अर्जुन पुरस्कार विजेत्या मुराद अली यांच्या आयोगातून देखील बाहेर जाण्यास सांगितले जाऊ शकते. दरम्यान, सध्या एनआरएआय प्रशिक्षक लेपिडस यांच्या मागे उभी असून आमचा कजाखस्तानच्या प्रशिक्षकावर पुर्ण विश्वास असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. एनआरएआयचे अध्यक्ष रानिंदर सिंग यांनी सांगितले की, ‘सुरुवातीच्या तपासणीनंतर आणि इतर प्रशिक्षक तसेच महासंघाशी निगडित व्यक्तींवर झालेल्या अशाप्रकारच्या आरोपांकडे पाहता लेपिडस यांच्यावरील आरोप वायफळ असल्याचे जाणवले. आमचा आमच्या प्रशिक्षकावर पहिल्यासारखाच विश्वास आहे. त्यांच्यावरील आरोपांमध्ये तथ्य नसून आम्ही आमच्या प्रशिक्षकाला पुर्ण पाठिंबा देणार आहोत.’(वृत्तसंस्था)

Web Title: Sexual abuse case athletics commission