सेव्हन अ साईड राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत औरंगाबादला उपविजेतेपद
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:05+5:302015-02-14T23:52:05+5:30
औरंगाबाद : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे नुकत्याच झालेल्या सेव्हन अ साईड राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत औरंगाबादच्या अपडेट स्पोर्टस् अकॅडमीने उपविजेतेपद पटकावले.

सेव्हन अ साईड राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत औरंगाबादला उपविजेतेपद
औ ंगाबाद : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे नुकत्याच झालेल्या सेव्हन अ साईड राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत औरंगाबादच्या अपडेट स्पोर्टस् अकॅडमीने उपविजेतेपद पटकावले.या स्पर्धेत २४ संघांनी सहभाग नोंदवला. औरंगाबादच्या अपडेट स्पोर्टस् अकॅडमी संघाने उपांत्य फेरीत नाशिकचा ३-0 असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. या लढतीत सतीश भोईटे, पंकज नाईक व रूपेश सावे यांनी प्रत्येकी १ गोल केला. त्यानंतर चुरशीच्या अंतिम सामन्यात मनमाड बॉईजकडून औरंगाबाद संघाला १-0 गोलने पराभव पत्करावा लागला. विशेषत: औरंगाबादच्या अपडेट स्पोर्टस् संघाने या सामन्यावर वर्चस्व राखले असतानाही त्यांना पराभव पत्करावा लागला. उत्तरार्ध संपण्यास अवघी दहा मिनिटे बाकी असताना मनमाड बॉईजने विजयी गोल केला. या स्पर्धेत औरंगाबादच्या मोहंमद अजमल याला बेस्ट डिफेंडरचा पुरस्कार मिळाला. (क्रीडा प्रतिनिधी)