मालिका जिंकली; क्लीन स्वीप हुकले...

By Admin | Updated: February 1, 2016 02:33 IST2016-02-01T02:33:24+5:302016-02-01T02:33:24+5:30

दोन सामने जिंकून मालिका खिशात घालणाऱ्या भारतीय महिला संघाला आॅस्ट्रेलियाविरुद्ध क्लीन स्वीपची संधी होती. मात्र, अखेरच्या सामन्यात सुमार फलंदाजीमुळे भारताला १५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला

Series won; Clean sweep hookah ... | मालिका जिंकली; क्लीन स्वीप हुकले...

मालिका जिंकली; क्लीन स्वीप हुकले...

सिडनी : दोन सामने जिंकून मालिका खिशात घालणाऱ्या भारतीय महिला संघाला आॅस्ट्रेलियाविरुद्ध क्लीन स्वीपची संधी होती. मात्र, अखेरच्या सामन्यात सुमार फलंदाजीमुळे भारताला १५ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. आॅस्ट्रेलियाच्या १३७ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ एकवेळ १३.३ षटकांत ३ बाद
९४ धावा, अशा स्थितीत होता. संघ जिकणार, असेही वाटत होते. मात्र, मध्यक्रम उद्ध्वस्त झाल्याने भारताला १२१ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने शेवटच्या ६.३ षटकांत केवळ २७ धावा केल्या. यासाठी त्यांनी ५ फलंदाज गमावले. भारताकडून सलामीवीर वेलास्वामी वनिताने २५ चेंडूंत सर्वाधिक २८ धावा केल्यास. यात तिने ३ चौकार आणि एक षटकार ठोकला. हरमनप्रीत कौरने २४ धावांचे योगदान दिले. वनिता आणि कर्णधाार मिताली राज (१२) यांनी पहिल्या गड्यासाठी ३३ धावांची भागीदारी केली. १६ व्या षटकांत भारताने दोन फलंदाज गमावले. (वृत्तसंस्था)

Web Title: Series won; Clean sweep hookah ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.