सेरेना विल्यम्सला हरवत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन
By Admin | Updated: January 30, 2016 16:43 IST2016-01-30T16:32:15+5:302016-01-30T16:43:52+5:30
जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने पहिल्या मानांकनावर असलेल्या सेरेना विल्यम्सला ऑस्ट्रेलियान ओपनच्या अंतिम फेरीत ६ -४, ३ - ६, ६ - ४ असं पराभूत करत नवा इतिहास रचला

सेरेना विल्यम्सला हरवत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने जिंकली ऑस्ट्रेलियन ओपन
>
ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 30 - जर्मनीच्या अँजेलिक कर्बरने पहिल्या मानांकनावर असलेल्या सेरेना विल्यम्सला ऑस्ट्रेलियान ओपनच्या अंतिम फेरीत ६ -४, ३ - ६, ६ - ४ असं पराभूत करत नवा इतिहास रचला आहे. कर्बरचं हे पहिलंच ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.
विशेष म्हणजे गेल्या २० वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिला महिला खेळाडू कर्बर आहे.
सेरेनाविरुद्धचा पहिला सेट ६ -४ असा जिंकल्यानंतर कर्बर किंचितशी सैलावल्यासारखी झाली. सेरेनाने जोरदार मुसंडी मारताना दुसरा सेट ६ - ३ असा जिंकला. परंतु तिस-या सेटमध्ये कर्बरने पुन्हा चांगला खेळ करत ६ - ४ असा हा सेट जिंकला आणि ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली.
गेल्या सहा वेळा सेरेना विल्यम्सने ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली होती आणि यावेळीही तिच जिंकेल असा तज्ज्ञांचा अंदाज होता. आज जर सेरेना जिंकली असती तर तिने स्टेफी ग्राफच्या २२ ग्रँड स्लॅम स्पर्धांचे जेतेपद पटकावण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली असती.
सेरेना विल्यम्सने २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. परंतु यु.एस ओपनच्या उपांत्य फेरीत सेरेनाला रॉबर्टा विन्सीने हरवले होते. आता आज सातव्या मानांकनावर असलेल्या कर्बरने ऑस्ट्रेलियान ओपन जिंकताना सेरेनाला हरवलं आहे.