सेरेना विल्यम्सकडे ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद
By Admin | Updated: January 31, 2015 17:49 IST2015-01-31T17:28:07+5:302015-01-31T17:49:47+5:30
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विल्यम्सने रशियाच्या मारिया शारापोव्हाचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले

सेरेना विल्यम्सकडे ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद
ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. ३१ - जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विल्यम्सने रशियाच्या मारिया शारापोव्हाचा पराभव करत ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. सेरेनाचे करिअरमधील हे १९वे ग्रँडस्लॅम असून तिने सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली आहे.
शनिवारी रंगलेल्या या सामन्यात सेरेनाने मारियाचा ६-३, ७-६ (७/५) असा पराभव करत विजेतेपद पटकावले.
उपांत्य फेरीत मारिया शारापोव्हाने एकातोरिना माकारोव्हाचा तर सेरेना विल्यम्सने मॅडिसन किजचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे आजची अंतिम लढत अतिशय रंगतदार ठरली.