सेरेना, व्हिनस सेमिफायनलमध्ये भिडणार

By Admin | Updated: August 10, 2014 02:01 IST2014-08-10T02:01:53+5:302014-08-10T02:01:53+5:30

सेरेना विल्यम्स आणि व्हिनस विल्यम्स यांनी रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून उपांत्य फेरी गाठली आह़े

Serena, Venus will fight in the semi-finals | सेरेना, व्हिनस सेमिफायनलमध्ये भिडणार

सेरेना, व्हिनस सेमिफायनलमध्ये भिडणार

>माँट्रीयल : जागतिक क्रमवारीतील नंबर वन टेनिसपटू अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि व्हिनस विल्यम्स यांनी रॉजर्स चषक टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रतिस्पर्धी खेळाडूंना धूळ चारून उपांत्य फेरी गाठली आह़े आता फायनलमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी या विल्यम्स भगिनी एकमेकींसमोर उभ्या ठाकणार आहेत़ टेनिस कोर्टवर आमनेसामने येण्याची ही त्यांची 25वी वेळ असणार आह़े 
सेरेना विल्यम्स हिने उपांत्यपूर्व फेरीत डेन्मार्कच्या 11 वे मानांकन प्राप्त रॉलीन वोज्निायाकीला 4-6, 7-5, 7-5 अशी धूळ चारून सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळविला, तर व्हिनसने 14वे मानांकन प्राप्त स्पेनच्या कार्ला सुआरेज नवारोवर 4-6, 6-2, 6-3 अशी सरशी साधली़ 
सेरेना आणि व्हिनस टेनिस कोर्टवर 25 व्यांदा आमनेसामने येणार आह़े 2क्13 मध्ये या दोन्ही बहिणी चाल्र्सटन टेनिस स्पर्धेत अखेरच्या वेळी उपांत्य फेरीत एकमेकींशी झुंजल्या होत्या़ त्या लढतीत सेरेनाने बाजी मारली होती़ सेरेनाने 2क्क्9 च्या विम्बल्डन ओपनच्या फायनलसह गत पाच लढतींत व्हिनसवर मात केली आह़े 
अन्य उपांत्यपूर्व फेरीत पोलंडच्या एग्नियस्का रंदवास्का हिने बेलारूसच्या व्हिक्टोरिया अजारेंकावर 6-2, 6-2 असा विजय मिळवीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला, तर रशियाच्या एकतेरिना मकारोव्हाने कोको वांदेवेगेला 6-1, 4-6, 6-1 अशा 
गुण फरकाने धूळ चारली 
आणि सेमिफायनलचे तिकीट पक्के केल़े (वृत्तसंस्था)

Web Title: Serena, Venus will fight in the semi-finals