दुखापतीमुळे सेरेनाची चायना ओपनमधून माघार
By Admin | Updated: October 3, 2014 22:56 IST2014-10-03T22:56:16+5:302014-10-03T22:56:16+5:30

दुखापतीमुळे सेरेनाची चायना ओपनमधून माघार
>बीजिंग: जागतिक नंबर वनची खेळाडू अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने सॅम स्टोसूरविरुद्ध होणार्या उपांत्यपूर्व फेरीतील लढतीला काही काळाचा अवकाश असताना आपल्या पायाच्या दुखापतीमुळे चायना ओपनमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला; मात्र डब्ल्यूटीएला आशा आहे की ही स्टार खेळाडू सिंगापूरमध्ये आपल्या डब्ल्यूटी किताब वाचविण्यासाठी नक्की खेळेल़००००००००००००००००००००००००००००००नागालँड ऑलिम्पिक संघाकडून मेरिकॉमचे अभिनंदनकोहिमा: नागालँडचे खासदार आणि नागालँड ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष नेफिया रियो यांनी स्टार महिला मुष्टियुद्धा एम़सी़ मेरीकॉमला इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे़ मेरीकॉमचे शानदार प्रदर्शन संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे़ मेरीकॉमच्या या यशाने प्रेरित होऊन भविष्यात आणखी चॅम्पियन्स समोर येतील अशी अपेक्षा वर्तविली आहे़