सेरेना, मरे, फेडरर दुसऱ्या फेरीत

By Admin | Updated: June 29, 2016 00:17 IST2016-06-29T00:17:52+5:302016-06-29T00:17:52+5:30

अमेरिकेची सेरेना विलियम्स यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विम्बल्डनमध्ये विजयी सलामी दिली.

Serena, Murray, Federer in second round | सेरेना, मरे, फेडरर दुसऱ्या फेरीत

सेरेना, मरे, फेडरर दुसऱ्या फेरीत

ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 29 - सात वेळचा विम्बल्डन विजेता टेनिससम्राट स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर, दुसरा मानांकित ब्रिटनचा अँडी मरे गतचॅम्पियन अग्रमानांकित अमेरिकेची सेरेना विलियम्स यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विम्बल्डनमध्ये विजयी सलामी दिली.
गेल्या चार वर्षांमध्ये एकही ग्रँडस्लॅम जिंकू न शकलेल्या फेडररने यंदा आपला ग्रँड दुष्काळ संपवण्याचा निर्धार केला असून त्याने अपेक्षित सुरुवात केली. चुरशीच्या झालेल्या सलामीच्या सामन्यात फेडररने गुईडो पेलाला ७-६, ७-६, ६-३ असे नमवले. स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत फेडररपुढे ब्रिटिश क्वालिफायर मार्कस विलिसचे आव्हान असेल. मार्कस जागतिक क्रमवारीत ७७२ व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे गुडघा आणि पाठदुखीमुळे फेडररने यंदाच्या फ्रेंच ओपनमधून माघार घेतली होती. यामुळे त्याच्या सलग ६५ ग्रँडस्लॅम खेळण्याच्या मालिकेला ब्रेक लागला.
त्याचप्रमाणे, सहाव्या मानांकित मिलोस राओनिक, पाचव्या मानांकित केई निशिकोरी आणि १६ व्या मानांकित जाइल्स सिमोन यांनीही विजयी सलामी देताना आगेकूच केली. राओनिकने एकतर्फी झालेल्या सामन्यात सहज बाजी मारताना स्पेनच्या पाब्लो कारिनोचा ७-६, ६-२, ६-४ असा पराभव केला. निशिकोरीनेदेखील सरळ तीन सेटमध्ये बाजी मारताना आॅस्टे्रलियाच्या सॅम्युअल ग्रोथला ६-४, ६-३, ७-५ असे नमवले, तर सिमोनला मात्र विजयासाठी सर्बियाच्या जांको टिप्सारेविचविरुद्ध ४-६, ६-४, ७-५, ६-३ असे झुंजावे लागले. ब्रिटनच्या अँडी मरेने आपल्याच देशाच्या लियाम ब्राडीचा ६-२, ६-३, ६-४ असा पराभव केला.
महिला एकेरीत अमेरिकेच्या सेरेना विलियमने स्वित्झर्लंडच्या अमरा सादिकोव्हिचचा १ तास १३ मिनिटे चाललेल्या लढतीत ६-२, ६-४ असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जर्मनीच्या चौथ्या मानांकित अँजेलिका केर्बरने दणदणीत विजयी सलामी देताना ब्रिटनच्या लॉरा राब्सनचा ६-२, ६-२ असा धुव्वा उडवला, तर फ्रेंच विजेती आणि दुसरी मानांकित गरबाइन मुगुरुजा हिनेही आपल्या लौकिकानुसार विजयी सुरुवात करताना इटलीच्या कॅमिली ज्योर्जीचे आव्हान ६-२, ५-७, ६-४ असे परतावले.

Web Title: Serena, Murray, Federer in second round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.